AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे नोकर भरती आंदोलन प्रकरण; राज ठाकरे कोर्टात हजर, न्यायालयात नेमकं काय घडलं?

2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण रेल्वे स्थानकात मनसे कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीय उमेदवारांविरोधात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज सुनावणी पार पडली.

रेल्वे नोकर भरती आंदोलन प्रकरण; राज ठाकरे कोर्टात हजर, न्यायालयात नेमकं काय घडलं?
raj thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: May 13, 2026 | 5:03 PM
Share

2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण रेल्वे स्थानकात मनसे कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीय उमेदवारांविरोधात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात ठाणे न्यायालयात सुनावणी पार पडली, यावेळी राज ठाकरे देखील हजर होते. यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना काही प्रश्न विचारले, त्याची उत्तर त्यांनी दिली, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 18 मे रोजी होणार आहे.

न्यायालयात नेमकं काय घडलं? 

18.10.2008 ला रेल्वे विभागात परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हे खरं आहे की खोटं? असा प्रश्न यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना विचारला, या प्रश्नाचं उत्तर देताना हे खोट असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर तुमच्या विरोधात खोटी केस केली असं तुमचं म्हणणं आहे, त्याचं कारण काय? असा सवाल यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना केला.  यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, तेव्हा मी इथे नव्हतो, काही कारणानिमित्त नाशिकला गेलो होतो.

दरम्यान  ज्या प्रकारे साक्षीदारांनी जवाब नोंदविले – त्यामध्ये आपल्या मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वेची परीक्षा देण्यसाठी आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थ्यांना लाठी काठी घेऊन  मारहाण केली असा आरोप आहे, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? असा सवालही यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना विचारला. यावर उत्तर देताना हे खोटं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 18 मे रोजी होणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेचं देखील मोठं नुकसान केल्याचा आरोप आहे.  या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल आहे.  राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले, हिंसाचाराला प्रोत्साहन दिले असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी या आधीची सुनावणी 11 डिसेंबर 2025 रोजी झाली होती. ज्यामध्ये आपल्याला गुन्हा कबूल नाही, असं राज ठाकरे यांनी कोर्टासमोर सांगितले होते. आपण न्यायालयीन प्रक्रियेला संपूर्णपणे सहकार्य करू असंही राज ठाकरेंनी त्यावेळी कोर्टात म्हटलं होतं.  याच प्रकरणात आता पुन्हा एकदा सुनावणी पार पडली आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?