मोठं संकट, पावसाचा रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी, प्रशासनाकडून नागरिकांना मोठे आवाहन

Rain Update : आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झालीये. पुणे, ठाणे, गोदिंया या जिह्लांमध्ये पावसाला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. यासोबतच संततधार पावसाने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

मोठं संकट, पावसाचा रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी, प्रशासनाकडून नागरिकांना मोठे आवाहन
पाऊस
| Updated on: Jul 26, 2025 | 8:33 AM

मुंबई : राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे बघायला मिळतंय. अनेक ठिकाणी आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. रेड अलर्टसह ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला असून अनेक जिल्हांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केलीये. सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि सांगलीमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. 

मुंबई, ठाणे आणि पुण्यात पावसाचा रेड अलर्ट 

मुंबई, ठाणे आणि पुण्यात पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. महाडच्या पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलीये. पालघरमध्ये संततधार पाऊस सुरू असून पाण्याच्या पातळीत वाढ झाली. 

काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शाळा राहणार बंद 

पालघर, पुणे, गोदिंया या जिल्हांना रेल अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईत आज पावसाचा ऑरेंज अलर्ट असून सकाळीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यासोबतच मराठवाडा, विदर्भातही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पठ्ठा निर्माण झाला असून देशात सर्वत्र पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. 

प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन 

हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केल्या असून पावसाला सुरूवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आली आहेत ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन केले.

जालना जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी

जालना जिल्ह्याच्या विविध भागात मागील 4 ते 5 दिवसापासून पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकाचे अतोनात नुकसान झाले तर काही ठिकाणी हाच पाऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासादायक ठरला. जालना जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान 

गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. हवामान खात्याकडून गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रात्रीपासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू झाला असून गोंदिया जिल्ह्यातील बेवारटोला प्रकल्प ओर फ्लो झाला आहे. तर इतर धरांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग सुरू आहे आणि अनेक शेती पाण्याखाली गेली आहे.

इंद्रावती आणि परलाकोटा नदीला पूर परिस्थिती

गडचिरोली भामरागड तालुक्यात काल ओसरलेला पूर पुन्हा वाढत असल्यामुळे मार्ग बंद झालाय. भामरागड तालुक्याच्या संपर्क कालही जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला होता. सायंकाळी पूर ओसरल्याने हा रस्ता काही तासांसाठी नियमित सुरू करण्यात आला. परंतु आज सकाळी सात वाजेपासून पुराच्या पाण्यात वाढ होत आहे. इंद्रावती नदीला व परलाकोटा नदीला पूर परिस्थिती कायम आहे. वसई विरारसह पालघर जिल्ह्यात आज दिवसभर हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.  विरारहून चर्चगेटला जाणारी लोकल सेवा सुरळीत सुरू आहे.