AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाचा हाहाकार! शाळांना सुट्टी जाहीर, रेड अलर्ट जारी, नागरिकांना..

Rain Update : भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. आज अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शाळांना सुट्टी जाहीर केली. नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला.

पावसाचा हाहाकार! शाळांना सुट्टी जाहीर, रेड अलर्ट जारी, नागरिकांना..
Rain Update
| Updated on: Jul 04, 2026 | 1:08 PM
Share

राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली. पावसाचा जोर वाढत असून आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. अतिमहत्वाच्या कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले. यासोबतच हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला. कोकणातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा आहे. सीएमओकडूनही हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला. जून महिना कोरडा गेला असला तरीही जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या पावसाच्या सरींनी शुक्रवारी चांगला जोर धरला सकाळपासूनच पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. पुढील तीन ते चार दिवस शहरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मध्यरात्रीपासून कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस झाला. आंबेडकर रोड पाण्याखाली गेला असून रस्त्याला जलमय स्वरूप प्राप्त झाले. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाचा जोर वाढला. सखल भागांसह अनेक रस्त्यांच्या कडेला पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पावसाचा जोर सकाळी वाढताना दिसतंय. मुंबईच्या काही सखळ भागात पाणी साचण्यास सुरूवात झाल्याचे बघायला मिळतंय. 4 ते 5 दिवसात विक्रमी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे. आज जवळपास ठिकाणीच पावसाचा इशारा देण्यात आला. कुठे रेड, ऑरेंज जारी करण्यात आला. गुजरात ते आग्रेय अरबी समुद्रात हवेता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा