AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राज्यात कडकडीत लॉकडाऊन झाला तर…’, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 12 महत्त्वाचे मुद्दे

राज्यात एकीकडे कोरोना वाढत असून दुसरीकडे आरोग्य व्यवस्था कमी पडत असल्याचं त्यांनी म्हटलं. रुग्णालयात रुग्णांना बेड असून मिळत नसल्याचा थेट आरोप यावेळी राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आला.

'राज्यात कडकडीत लॉकडाऊन झाला तर...', राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 12 महत्त्वाचे मुद्दे
राज ठाकरे, मनसेप्रमुख
| Edited By: | Updated on: Apr 06, 2021 | 12:15 PM
Share

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या उद्रेकावर आणि राजकीय राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा खुलासा केला. राज्यात जर कडक लॉकडाऊन झाला तर सर्वसामान्य माणसांचं खूप नुकसान होईल आणि याचे गंभीर परिणाम होतील असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. इतकंच नाहीतर लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी नियमांचं पालन केलं पाहिजे असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray press conference on maharashtra lockdown and corona update important points)

दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयीही भाष्य केलं आहे. राज्यात एकीकडे कोरोना वाढत असून दुसरीकडे आरोग्य व्यवस्था कमी पडत असल्याचं त्यांनी म्हटलं. रुग्णालयात रुग्णांना बेड असून मिळत नसल्याचा थेट आरोप यावेळी राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना का वाढला याची दोन कारणं आज सांगितली. राज यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही कारणं मांडली असून त्यावर उपाय करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. लॉकडाऊनबाबत बोलण्यासाठी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. परंतु त्यांच्या आजूबाजूला कोविडचे रुग्ण असल्याने ते क्वॉरंटाईन आहेत. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. म्हणून झूम अॅपवरून आमचं बोलणं झालं. त्यात कोविड आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाली, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे…

– उत्पादनाबाबत – जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलं आहे पण विक्रीला बंदी आहे, असं असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे, विकायचं नाही तर उत्पादन का करायचं? म्हणून मी सांगितलं दोन तीन दिवस विक्रीसाठी सुरु ठेवा. छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्या

– बँकांची जबरदस्ती – अनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?

– वीज बिल – सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे

– व्यवसाय कर – जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना  सूट द्या, राज्याने केंद्राशी बोलावं

– कंत्राटी कामगार – लॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतलं होतं, पण नंतर काढून टाकलं.. मी सूचना केली, त्यांना घ्या, तहान लागली की विहीर खोदणं योग्य नाही़

– या सूचना योग्य आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळाशी बोलण्याचं आश्वासन दिलं.

– जीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी

– स्वीमिंग पूल बंद ठिक आहे. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी.

– सरकारची तिजोरी माहिती आहे. शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. शेतकरी जर कोसळला तर पुन्हा अजून मोठं संकट येईल

– शेवटची सूचना शाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत. या शाळांना फी घेऊ नका, अर्धी घ्या

– दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा. ते कोणत्या मानसिकतेत माहिती नाहीत. ही पोरं तर लहान, कुठून अभ्यास करणार , कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत

– खालच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं, तसं दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे ढकला.

यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावरही चर्चा केली. जर भाजप सरकार पाडण्याचं काम करत आहेत तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांबद्दलही तर प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राजीनामे देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक प्रकरणात मुळ मुद्दा बाजूला राहत असून इतर बाबींवर लक्ष केंद्रीत केलं जात असल्याचंही यावेळी राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray press conference on maharashtra lockdown and corona update important points)

संबंधित बातम्या – 

अनिल देशमुख हा विषय महत्त्वाचा नाही, बॉम्ब कोणाच्या सांगण्यावरून ठेवला हे शोधा : राज ठाकरे

Raj Thackeray PC | मुख्यमंत्री स्वत: क्वारंटाईन, त्यामुळे फोनवरच आमची चर्चा

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सर्वात महत्त्वाच्या सूचना नेमक्या काय?

(Raj Thackeray press conference on maharashtra lockdown and corona update important points)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या