AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : फक्त मशिदीच नाही तर मंदिरावरचेही भोंगे उतरले पाहिजे, राज ठाकरेंच्या मागणीचा वाद होणार?

राज्यातील फक्त मशिदींवरचे नाही तर मंदिरांवरचेही त्रासदायक भोंगे उतरले पाहिजेत, अशी भूमिका आज राज ठाकरे यांनी स्पष्ट केली.

Raj Thackeray : फक्त मशिदीच नाही तर मंदिरावरचेही भोंगे उतरले पाहिजे, राज ठाकरेंच्या मागणीचा वाद होणार?
Raj ThackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 1:33 PM
Share

मुंबईः राज्यातल्या फक्त मशिदीच नाही तर मंदिरांवरचेही भोंगे (Loud speakers on Temples) उतरले पाहिजेत. सुप्रीम कोर्टाच्या  (Supreme court)आदेशाची अंमलबजावणी सर्वांसाठीच बंधनकारक आहे, अशी मागणी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. त्यामुळे आता मंदिरांवरील लाऊड स्पीकरवरून नवा वाद निर्माण होणार का, अशी चर्चा आहे. 04 मे रोजी मशिदींवरचे भोंगे उतरले पाहिजेत, असा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानुसार राज्यभरात पडसाद दिसून येत आहेत. याविषयीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यभरातील अनेक मशिदींमध्ये आज अजान झालीच नाही, अशी माहिती मनसैनिकांनी दिली असून हा विषय मौलवींनी योग्य रितीने समजून घेतल्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच ही मागणी केवळ मशिदींसाठी नाही तर मंदिरांसाठीही आहे, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मंदिरांवरही दिवसभरात कुठेही असे नियमाबाहेर लाऊडस्पीकर वाजत असतील तर तेही उतरले पाहिजेत, अशी मनसेची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘अनेक ठिकाणी अजान झाली नाही-राज ठाकरे’

राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘ मला आज सकाळपासून महाराष्ट्रातून, बाहेरूनही फोन येत आहेत. नेत्यांनाही फोन येत आहेत. पोलिसांचेही फोन येत आहेत. काही गोष्टी सांगत आहेत. सर्वसाधारणपणे आत्ता अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना, सैनिकांना पोलीस नोटीस पाठवत आहेत. ही गोष्टी आमच्याबाबतीत का होतेय, एवढाच प्रश्न आहे. कायद्याचं पालन करतायत, त्यांना सजा देणार. जे करत नाहीत, त्यांना मोकळीक देणार. तरीही मी आज निश्चित सांगेन की जवळपास 90-92 टक्के ठिकाणी सकाळजी अजान झाली नाही. सर्व ठिकाणी लोकं तयारच होते. पण मी खास करून सर्व मशिदींमध्ये जे काही चालवणारे मौलवींचे आभार मानतो. आमचा विषय त्यांना नीट समजला, हे महत्त्वाचं..’

‘ मंदिरांवरचेही भोंगे खाली आले पाहिजेत’

भोंगे उतरवण्याचा विषय केवळ मशिदींसाठीचा नाही तर मंदिरांसाठीदेखील हाच नियम आहे, असे सांगताना राज ठाकरे म्हणाले, ‘ हा विषय क्रेडिटचा नाही. हे आमच्यामुळे नाही. सामंजस्याने हे विषय नीट हाताळले तर हा विषय सगळ्यांचा आहे. मला असं क्रेडिट घ्यायची इच्छा नाही. आम्ही फक्त बोललो. लोकांनी मानय् केली. मौलवींना हा विषय समजला. सरकारपर्यंत पोहोचला. पोलीस दलाला धन्यवाद देतो. माध्यमांनी हा विषय नीट पोहोचवला. त्यामुळे हा एक कलेक्टिव एफर्ट होता. त्यामुळे लोकांना जो दिवसभराचा त्रास होतो, तो बंद होईल, ही अपेक्षा आहे. हा विषय मशिदींवरच्या भोंग्यांचा आहे, असं नाही. मंदिरांवरचे भोंगेही खाली आले पाहिजेत. विश्वास नांगरे पाटलांनी आम्हाला सांगितलं की, आम्ही भोंग्यांना परवानगी दिली. यातल्या बहुतांश मशिदी अनधिकृत आहेत. भोंगेही अनधिकृत आहेत. माझ्या कल्पनेबाहेरची गोष्ट आहे. हा काही सकाळच्या अजानचा विषय़ नाही. दिवसभर त्यांचे नमाज सुरु असतील तर त्या त्या वेळेला हनुमान चालीसा वाजणार.सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची आठवण वारंवार मनसेकडून करून दिली जाणार’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.