AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackray: सुवर्णपदक विजेत्याला अडीच तास ताटकळत उभं का राहावं लागलं? राज ठाकरे म्हणाले, अरे मलाच…

कॉमनवेल्थ गेम्समधील (राष्ट्राकुल क्रीडा स्पर्धा) 2026 या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू दिलीप गावित हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी काल गेले होते. दिलीपसोबत त्याचे प्रशिक्षक वैजनाथ काळेही उपस्थित होते. पण ही भेट काही झालीच नाही.

Raj Thackray: सुवर्णपदक विजेत्याला अडीच तास ताटकळत उभं का राहावं लागलं? राज ठाकरे म्हणाले, अरे मलाच...
| Updated on: Aug 07, 2026 | 10:37 AM
Share

कॉमनवेल्थ गेम्समधील (राष्ट्राकुल क्रीडा स्पर्धा) 2026 या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू दिलीप गावित हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी काल गेले होते. दिलीपसोबत त्याचे प्रशिक्षक वैजनाथ काळेही उपस्थित होते. पण ही भेट काही झालीच नाही. दिलीप आणि प्रशिक्षक काळे यांना तब्बल दोन ते अडीच तास ताटकळत राहावे लागले. इतका वेळ थांबूनही भेट काही झालीच नसल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही भेट झाली नाही त्यामुळे ते दोघेही राज ठाकरे यांना न भेटताच माघारी परतले. भेट ही ठरलेली असतानाही ही भेट झाली नाही म्हणून दोघांनाही संताप अनावर झाला. वेळ वाया गेल्याने दोघेही अत्यंत नाराज झाले. भेट द्याची नव्हती तर बोलावले का असा प्रश्न उपस्थित करुन ते दोघही माघारी परतले. ते निघून जात असल्याचे पाहून मनसे पदाधिकारांची मोठी धावपळ उडाली आणि ते त्यांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करु लागले पण ते काही थांबले नाही. आता याची दखल राज ठाकरे यांनी घेतली आहे.

राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज नाशिक दौऱ्याचता दुसरा दिवस आहे. आज राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषदेची सुरुवातच त्यांनी खेळाडूसोबत न झालेल्या भेटीवरुन केली. त्यांनी सांगितले की, “एका गोष्टीचा खुलासा करतो. काल आपले खेळाडू गावित काल येऊन गेले. तुमच्याकडे बातम्या पाहिल्या. एक तर त्यांना कोणी बोलावलं माहीत नाही. ते आले हे मला कोणी सांगितलं नाही. ते आले आणि मी भेटणार नाही असं का करेन मी. मला माहीत नसलेल्या गोष्टीवर बातम्या आल्या. त्यांचाही गैरसमज झाला. दोन तास थांबले आणि मी भेटलो नाही. पण मला माहीतच नव्हतं ते आल्याचे. मला जर कोणी सांगितलं असतं तर मी त्यांना नक्की भेटलो असतो. त्यांना कोणी बोलावलं आणि मला सांगितलं नाही या गोष्टी बाजूला ठेवा. पण ते आले आणि भेट झाली नाही या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ते दिल्लीला गेले. ते आल्यावर मी त्यांची भेट घेईन आणि त्यांच्याशी बोलेन. तुमचाही संपर्क झाला तर त्यांच्या कानावर या गोष्टी घाला.”
दिलीप महाडू गवीतने 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 100 मीटर टी47 प्रकारात 10.71 सेकंदांचा क्रीडा विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक जिंकले, तेव्हा संपूर्ण देशाने त्याचा वेग पाहिला. पुरुषांची 100 मीटर टी47 ही स्पर्धा शारीरिक अपंगत्व असलेल्या किंवा एक हात नसलेल्या खेळाडूंसाठीची एक पॅरा-ॲथलेटिक्स स्प्रिंट स्पर्धा आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...