AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या? बीडमधून मोठी बातमी समोर

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या? बीडमधून मोठी बातमी समोर
dhananjay mundeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 18, 2025 | 5:18 PM
Share

निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले होते. ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये देण्यात आले होते, असं रंजित कासले यांनी म्हटलं होतं. त्यांनी यावेळी त्यांचं बँक स्टेटमेंट देखील दाखवलं. त्यातील साडेसात लाख रुपये आपण वापस केले, तर उरलेल्या अडीच लाख रुपयांमधून माझा खर्च सुरू आहे, असं कासले यांनी म्हटलं होतं. कासले यांच्या आरोपांनंतर आता माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कासलेंच्या आरोपांचा दाखला देत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख हे आता न्यायालयात धाव घेणार आहेत. ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये दिल्याचा आरोप रणजित कासले यांनी केला होता. कासलेंच्या आरोपांचा दाखला देत राजेसाहेब देशमुख कोर्टात जाणार आहेत, ते मुंडेंच्या आमदारकीविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. एकट्या रंजित कासले यांना जर दहा लाख रुपये दिले असतील तर बाकिच्यांना किती दिले? अस सावाल राजेसाहेब देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाले राजेसाहेब देशमुख? 

रंजित कासले यांनी सांगितलं की ईव्हीएम छेडछाडच्या मोबदल्यात मला दहा लाख रुपये दिले. एका कासलेला दहा लाख रुपये दिले, मग इतर पोलीस अधिकाऱ्यांना किती दिले, धनंजय मुंडे कोण आहेत? आणि त्यांचं काय कार्य आहे? आणि लोकशाहीत किती सक्षमपणे काम चाललं आहे, हे तुम्ही सर्वांनी आता पाहिलं, म्हणून मी आता या प्रकरणात दाद मागण्यासाठी हाय कोर्टात जाणार आहे, असं राजेसाहेब देशमुख यांनी म्हटलं आहे.

काय आहेत रणजित कासलेंचे आरोप?  

गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन रंजित कासले यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. मला ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी दहा लाख रुपये देण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच वाल्मिक कराड यांच्या एन्काऊंटरसंदर्भातील चर्चा बंददाराआड झाली होती असंही त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल