Ramadan Eid 2022 : ईदचा चंद्र दिसला, उद्या देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी होणार

आज अखेर ईदचा चंद्र दिसला आहे. त्यामुळे उद्या देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे दोन वर्षांनंतर मोकळेपणाने ईद साजरी होत आहे.

Ramadan Eid 2022 : ईदचा चंद्र दिसला, उद्या देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी होणार
उद्या ईद साजरी होणारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 8:11 PM

मुंबई : आज अखेर ईदचा (Ramadan Eid 2022) चंद्र (Moon) दिसला आहे. त्यामुळे उद्या देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यंदा कोरोनाचा (Corona Update) कहर कमी झाल्यामुळे दोन वर्षांनंतर मोकळेपणाने ईद साजरी होत आहे. दोन वर्षांच्या कोरोनाने लावलेल्या ब्रेकरनंतर आता बाजरपेठा पुन्हा फुलू लागल्या आहेत. ईदच्या आधी खरेदीदारांची मोठी गर्दी झाली असल्याचेही दिसून येत आहे. आजूबाजूच्या बाजारपेठेतील दुकाने आणि स्टॉलवर स्थानिक लोक तसेच शहराच्या इतर भागातील लोकांनी खाण्याचे साहित्य, कपडे आणि पादत्राणे खरेदी केली गेली आहे, तर अजूनही काही जणांची खरेदी सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणताही सण कोरोनामुळे नीट साजरा करता आला नव्हता, प्रत्येक सणावर मर्यादा आल्या होत्या. यंदा मात्र थोडा दिलासा मिळाला आहे.

ईद-उल-फितर

ईद-अल-फितर किंवा ईद-उल-फितर ही जगभरातील मुस्लिमांनी पाळली जाणारी एक प्रमुख धार्मिक प्रथा आहे. रमजान, इस्लामिक उपवासाचा पवित्र महिना संपतो. हा उत्सव रमजान महिन्यात मुस्लिम पाळत असलेल्या पहाटे ते संध्याकाळपर्यंतच्या उपवासाच्या 30 दिवसांच्या समाप्तीची आठवण करून देतो. याचा दिवस चंद्राच्या दर्शनावरून ठरत असल्याने, जगभरात पाळल्या जाणार्‍या अचूक तारखेमध्ये थोडाफार फरक असू शकतो.

मोठ्या प्रमाणात दानधर्म केले जाते

जगभरातील मुस्लिम लोक ईद-उल-फित्र साजरा करतात, जो सर्वात महत्वाचा सण आहे. हा रमजानच्या शेवटी साजरा केला जातो, ज्यामध्ये धर्मादाय कामे केली जातात, जसे की गरिबांना अन्न देणे आणि भिक्षा वाटणे. ईद-उल-फित्र साजरी करून, उपवास आणि प्रार्थना कालावधी संपतो. चंद्र पाहिल्यानंतर लोक नवीन कपडे घालतात आणि आपल्या प्रियजनांना भेटतात. भारत सहसा सौदी अरेबियाला फॉलो करतो, आपल्याकडे सौदी अरेबियाच्या एक दिवसानंतर चंद्र दिसतो. त्यामुळे आज रात्री आकाशात चंद्र दिसण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ईद साजरी करण्यास सुरूलात होईल आणि उद्याही सुरू राहील.

हे सुद्धा वाचा

कोरोनाच्या ब्रेकनंतर पुन्हा उत्साह

गेल्या दोन वर्षात जगाने कोरनाच्या तीन लाटा पाहिल्या आहेत. या तीन लाटा कधीही न विसण्यासारख्या आहेत. यात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. तर अनेकांनी आपले उद्योगधंदे देशोधडीला लागताना पाहिले आहेत. आता पुन्हा थोडी मोकळीक मिळू लागल्याने छोट्या व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पुन्हा उद्योगधंदे पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा ईद दणक्यात साजरी होणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.