AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जे कधीच राहिले नाही कुणाचे मिंधे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे’, रामदास आठवलेंची शेरोशायरीतून फटकेबाजी

"ज्यावेळेला मी येतो चंद्रपूरमध्ये, त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफल झालेलं चंद्रयान, साऱ्या जगाचं असतं भारताकडे ध्यान. या देशाची 140 कोटी जनता आहे नरेंद्र मोदींची फॅन, या निवडणुकीत लावणार आहोत आम्ही इंडिया आघाडीवर बॅन", अशी शेरोशायरी रामदास आठवलेंनी आपल्या भाषणात केली.

'जे कधीच राहिले नाही कुणाचे मिंधे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे', रामदास आठवलेंची शेरोशायरीतून फटकेबाजी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले
| Updated on: Apr 08, 2024 | 7:26 PM
Share

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चंद्रपूरमध्ये आयोजित महायुतीच्या सभेत आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी शेरोशायरीतून फटकेबाजी केली. “आपण सर्वजण मोठ्या संख्येने चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, त्याचबरोबर गडचिरोली-चिमूरचे भाजपचे उमेदवार, ज्यांना नेते म्हणण्याची गरज नाही त्यांच्या नावातच नेते आहेत ते अशोक नेते, या दोन्ही नेत्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत”, असं रामदास आठवले म्हणाले.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे कधीच राहिले नाहीत कुणाचे मिंधे ते एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे धाडसी माणूस, चाळीस प्लस 10 आमदारांना घेऊन… आता या ठिकाणी सुधीरभाऊ आलेले आहेत. आपण सर्वांनी जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारतचं गीत गाऊ, कारण या ठिकाणी आलेले आहेत सुधीर भाऊ. आपल्या सर्वांचे लाडके नेते इथे आलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंक सक्रिय राजकारणी आहेत. अत्यंत शक्तीशाली राजकारणी आहेत. या महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मजबूत करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील महायुती मजबूत करण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा फारच मोठा आहे वाटा, कारण त्यांनी काढलेला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काटा“, अशी फटकेबाजी रामदास आठवलेंनी केली.

आठवलेंची भाषणातून शेरोशायरी

“तिकडे राहून काही उपयोग नव्हता. मी पूर्वी तिकडे होतो पण तिकडे राहून काही उपयोग नव्हता. नरेंद्र मोदींचं नेतृत्व विकासाच्या दिशेने पुढे जाणारं आहे. ज्यावेळेला मी येतो चंद्रपूरमध्ये, त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफल झालेलं चंद्रयान, साऱ्या जगाचं असतं भारताकडे ध्यान. या देशाची 140 कोटी जनता आहे नरेंद्र मोदींची फॅन, या निवडणुकीत लावणार आहोत आम्ही इंडिया आघाडीवर बॅन“, अशी शेरोशायरी रामदास आठवलेंनी केली.

“इंडिया आघाडीवाले रोज शिव्या देतात. तुम्हाला द्याच्या तेवढ्या शिव्या द्या. पण त्या शिव्यांना जनता हे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही 400 पारचा नारा दिला आहे, 400 पार, आम्ही करणार आहोत 400 पार, मग का होणार नाही काँग्रेसचे हाल? काँग्रेस भ्रष्ट राजकारण करुन सत्तेवर राहिले, या देशाला धुळीला मिळवण्याचं काम केलं. नरेंद्र मोदी या देशात उभा राहिले. भ्रष्ट राजकारण्यांना खाली उचलण्याचा विडा त्यांनी उचलला. आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं आणि काँग्रेसला चकणाचूर करण्याचं काम 2019च्या निवडणुकीत झालं”, असं रामदास आठवले म्हणाले.

“या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी माझा रिपब्लिकन पक्ष तुमच्यासोबत आहे. बाबासाहेबांची जनता तुमच्याबरोबर आहे. या देशाचं संविधान कुणीच बदलणार नाही. जाणीवपूर्वक संविधान बदलणार अशी अफवा पसरवली जात आहे. पण मी तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदी संविधान मजबूत करणार नेते आहेत. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रात 48 पैकी 48 जागा जिंकून आपण नरेंद्र मोदींना मदत करायची आहे”, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलं.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.