Video : अन् दाजींनी स्वत:च धरला अंतरपाट, पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्याने रावसाहेब दानवेंची लगीनघाई

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच काही न काही कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दानवे यांनी चक्क वधु-वरामध्ये अंतरपाठ धरला आहे.

Video : अन् दाजींनी स्वत:च धरला अंतरपाट, पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्याने रावसाहेब दानवेंची लगीनघाई
अजय देशपांडे

|

Jul 03, 2022 | 3:57 PM

जालना: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) नेहमीच काही न काही कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ (video) देखील व्हायरल होतात. या व्हिडीओनंतर त्यांच्या साधेपणाच्या किस्सांची चर्चा रंगते. आता पुन्हा एकदा मंत्री रावसाहेब दानवे चर्चेत आले आहेत. त्याला कारण देखील तसेच आहे. रावसाहेब दानवे यांनी एका लग्नामध्ये (wedding) चक्क अंतरपाट धरला आहे. दानवे हे भोकरदनमधील एका लग्न सामारंभात गेले होते. त्यांना आधीच खूप उशिर झाला होता. दुसऱ्या एका कार्यक्रमाला हजेरी लावायची होती. परंतु इकडे वधु-वरामधील अंतरपाट धरण्यासाठी लवकर कोणी येत नसल्यामुळे अखेर रावसाहेब दानवे यांनी स्वतःच्या जागेवरून उठत अंतरपाट धरला. त्यामुळे पुन्हा एकदा दानवे चर्चेत आले आहेत. दरम्यान यापूर्वी देखील ते अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत.

उशीर होत असल्याने धरला अंतरपाट

रावसाहेब दानवे हे  भोकरदनमधील एका लग्न सामारंभात उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्यांना तेथून दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचे होते. मात्र या लग्नाला वेळ लागत होता. वधु-वरामधील अंतरपाठ धरण्यासाठी बराचवेळ कोणीच न आल्याने अखेर रावसाहेब दानवे हे आपल्या जागेवरून उठले व त्यांनी वधु-वरामध्ये अंतरपाठ धरला. एका केंद्रीय मंत्र्यांने चक्क अंतरपाठ धरल्याने हे लग्न चांगलेच चर्चेत आले आहे. या लग्नापेक्षाही पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांच्या साधेपणाची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

या आधीही अनेकदा चर्चेत

रावसाहेब दानवे हे नेहमीच काही न काही कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से रंगून सांगितले जातात. मग ते सामान्य माणसांसारखे रस्तयावर जेवन करणे असो, की भरसभेत फाटलेला सदरा दाखवणे असो. अनेकदा तर ते आपल्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत येतात. आता या व्हिडीओमुळे ते पुन्हा एकादा चर्चेत आले आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें