AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दम असेल तर या आणि माझं धोतर…, नाही तुमची पॅन्ट…’, आमदार रत्नाकर गुट्टे यांचं खासदाराला खुलं चॅलेंज

"मी या जनतेचे आणि मतदारंसघाचे कसे उपकार मानू यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या निवडणुकीत एकाही नेत्याला वाटत नव्हतं की मी निवडून येईन म्हणून. त्यांचं गणित असं होतं की, वेगवेगळे उमेदवार ओबीसींचे मते खाणार. त्यांनी हिशोब लावला होता", असा दावा रत्नाकर गुट्टे यांनी केला.

'दम असेल तर या आणि माझं धोतर..., नाही तुमची पॅन्ट...', आमदार रत्नाकर गुट्टे यांचं खासदाराला खुलं चॅलेंज
आमदार रत्नाकर गुट्टे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 03, 2025 | 5:34 PM
Share

“नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी प्रचार दरम्यान विकासाच्या मुद्द्यावरच बोलत होतो. पण विरोधकांकडे माझ्या विरोधात बोलण्यासारखे काहीच नसल्यामुळे वैयक्तिक टीका करण्यात येत होत्या. शिवसेना खासदार संजय जाधव तर माझे धोतर फिरतो, असे जाहीर म्हणत होते. मी त्यांना थेट चॅलेंज करतो की, खासदार साहेब तुमच्यात दम असेल तर या आणि माझे धोतर फाडून दाखवा, नाही तुमची पॅन्ट फाडून तुम्हाला वापस पाठवली तर नावाचा रत्नाकर गुट्टे नाही”, असे म्हणत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांना थेट आव्हानच दिले आहे. जिल्ह्यातून उबाठा गट उपटून टाकतो, असंही वक्तव्य आमदार गुट्टे यांनी केलं आहे.

‘काहीच लोकांनी माझ्यासाठी काम केलं’

“महायुतीच्या काहीच लोकांनी विधानसभा निवडणुकीत माझ्यासाठी काम केलं. बाकी जे सर्वच कडक कपडे घालणारे नेते असतात, ते किती सोबत होते ते मला माहिती. प्रत्येकाने बरंच काही केलं. पण त्यांच्या स्वत:च्या गावात ते होऊ शकलं नाही. कारण सगळे विरोधक माझ्या विरोधात असले तरी जनता माझ्या पाठिशी होती. माझे सर्व कार्यकर्ते सोबत होते. फक्त नेते होते, बाकी खालचे कार्यकर्ते काम करत नव्हते. तोंडावर फक्त थोडंफार काम करतोय, असं नेते दाखवायचे. पण खाली काम कुणीच करायचं नाही. ही परिस्थिती तीनही तालुक्यात होती”, असा दावा रत्नाकर गुट्टे यांनी केला.

‘मी निवडून येईल असं एकालाही वाटत नव्हतं’

“मी या जनतेचे आणि मतदारंसघाचे कसे उपकार मानू यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या निवडणुकीत एकाही नेत्याला वाटत नव्हतं की मी निवडून येईन म्हणून. त्यांचं गणित असं होतं की, वेगवेगळे उमेदवार ओबीसींचे मते खाणार. त्यांनी हिशोब लावला, जशी लोकसभेची निवडणूक होईल, तशीच विधानसभेची निवडणूक होईल. तशी झाली सुद्धा. मला 25 ते 30 टक्के मराठा समाजाचे मते मिळाली. मुस्लिम समाजाचे मते मिळाले. सर्वात जास्त कधी न मतं मिळणारे बौद्ध समाजाचे देखील मला मतं मिळाली. इथे गंगाखेडमध्ये 50 टक्क्यापेक्षा जास्त मला बौद्ध समाजाचे मते मिळाली”, असं रत्नाकर गुट्टे म्हणाले.

‘मला ओबीसी आणि मायक्रो ओबीसींनी तारलं’

“मला ओबीसी समाजाने तारलं. ओबीसी आणि मायक्रो ओबीसींनी मोठं मतदान केलं. मायक्रो ओबीसींचे या मतदारसंघात 84 हजार मतदार आहेत. सगळ्यांची नावे घेता येणार नाही. पण सर्व ओबीसी आणि मायक्रो ओबीसींनी मला तारलं. त्यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे. बाकी सगळ्यांचा हातभार लागला. मला मान्य आहे. पण या हातभारमध्ये 70 टक्के ओबीसी आणि मायक्रो ओबीसी समाजाचा लागला आहे”, असा दावा रत्नाकर गुट्टे यांनी केला.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?