AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घोषणा दिल्या, भाषण केलं… सकाळी मोर्चात अन् दुपारी अचानक मृत्यू, कुणबी समाजाच्या नेत्याच्या मृत्यूने रत्नागिरीत हळहळ

रत्नागिरी येथील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात झालेल्या मोर्चानंतर ओबीसी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल नावले यांचे अकस्मात निधन झाले. मोर्चानंतर घरी परतताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. नावले हे रत्नागिरी पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि कुणबी समाजाचे नेते होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण ओबीसी समाजात शोककळा पसरली आहे.

घोषणा दिल्या, भाषण केलं... सकाळी मोर्चात अन् दुपारी अचानक मृत्यू, कुणबी समाजाच्या नेत्याच्या मृत्यूने रत्नागिरीत हळहळ
कुणबी समाजाच्या नेत्याच्या मृत्यूने रत्नागिरीत हळहळ
| Updated on: Sep 16, 2025 | 3:10 PM
Share

रत्नागिरीमधून एक धक्कादायक आणि दु:खद बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या विरोधात रत्नागिरीत काल मोर्चा काढण्यात आला होता. मात्र त्याच मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एक नेत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मोर्चाला गालबोट लागलं. सकाळी आंदोलनात सहभागी झालेले ओबीसी नेते, सामाजिक कार्यकर्ते सुनिल नावले (वय 54) यांचं निधन झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल नावले हे रत्नागिरी पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि कुणबी समाजाचे नेते असून ते सामाजिक कार्यकर्तेही होते. काल (सोमवार) रत्नागिरीमध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या विरोधात एक मोर्चा काढण्यात आला होता. सुनिल नवले हे देखील कालच्या मोर्चात सहभागी झाले होते. त्यांचा मोर्चात सक्रीय सहभाग होता..

घरी आल्यावर अस्वस्थ वाटू लागलं, रिक्षातच…

सकाळी मोर्चा यशस्वीपणे पार पडल्यावर सुनिल नावले हे दुपारी त्यांच्या घरी गेले. मात्र घरी गेल्यावर थोड्या वेळीने त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांच्या घरच्यांसोबत ते लगेच रुग्णलयात तपासणीसाठी निघाले. मात्र रुग्णलयाच्या वाटेवर असताना रिक्षातच नवले यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि ते कोसळले.

त्यांना कुटुंबियांनी कसंबसं रुग्णालयता नेलं, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि अखेर मृत घोषित केलं. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.

सुनिल नवले यांच्या निधनामुळे केवळ त्यांच्या कुटुंबियांवरच नव्हे तर संपूर्ण ओबीसी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही बातमी कळताच अनेक नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सकाळी मोर्चात जे सोबत होते, दुपारी त्यांच्याच मृत्यूची बातमी ऐकून अनेकांचा कानावर विश्वासच बसेना.   समाजासाठी सातत्याने काम करणारे एक सक्रिय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून नवले यांची ओळख होती. मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.