बलात्कार प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे कोर्टाचे आदेश, आता मेहबूब शेख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणले…

| Updated on: Sep 25, 2021 | 1:31 AM

न्यायालयाच्या आदेशानंतर शेख यांनी माध्यमांना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रश्नच नाही. मी पुन्हा चौकशीला सामोरं जाईल, असं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.

बलात्कार प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे कोर्टाचे आदेश, आता मेहबूब शेख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणले...
mehbub shaikh
Follow us on

परभणी : बलात्कार प्रकरणातील पोलिसांनी सादर केलेला बी समरी रिपोर्ट न्यायालयाने रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं म्हटलं जात आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शेख यांनी माध्यमांना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रश्नच नाही. मी पुन्हा चौकशीला सामोरं जाईल, असं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे. (ready to face police enquiry once again said rape case accused mehbub shaikh)

फेर चौकशीला सामोरे जाणार- शेख

मेहबूब शेख यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केलेले आहेत. या आरोपांनतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात सुनावणी सुरु आहे. औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने 23 सप्टेंबर रोजी या प्रकरणात सादर केलेला बी समरी रिपोर्ट अमान्य केला आहे. तसेच पोलिसांना पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सन्माणीय न्यायालयाने फेर चौकीशे आदेश दिले आहेत. या फेर चौकशीला सामोरे जायला मी तयार आहे. माझीच बी समारी नाही तर अनेक बी समरीमध्ये कोर्ट फेर चौकशीचे आदेश देत असते. फेर चौकशीला मी सामोरे जाईल त्यानंतर पोलीस अहवाल करतील,” असे शेख म्हणाले.

पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही- शेख

न्यायालयाने बी समरी रिपोर्ट रद्द करताना तपासावर बोट ठेवत पोलिसांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर पोलिसांवर दबाव तर टाकला जात नाही ना ? असा प्रश्न विचारला जात होता. यावर बोलताना शेख यांनी पोलिसांवर कोणताही दबाव टाकला जात नसल्याचे सांगितले. “पोलिसांवर आम्ही दबाव आणला नाही. जर दबाव आणला असता तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला नसता. महिला पोलीस स्टेशनला गेली. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, त्यामुळे पोलिसांवर दबाव असण्याचा प्रश्नच नाही,” असे मेहबूब शेख म्हणाले.

काय आहे प्रकरण

सहायक पाेलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी बी समरी अहवाल न्यायालयात सादर केला होता. या प्रकरणी पीडितेने आपले म्हणणे मांडण्यासाठी ॲड. आय. डी. मनियार यांच्यामार्फत अर्ज दाखल केलेला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख (रा. शिरूर जि. बीड) यांच्याविरुद्ध 28 डिसेंबर 2020 राेजी सिडकाे पाेलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 वर्षीय पीडित तरुणी उच्च शिक्षित आहे. नाेकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून 14 नाेव्हेंबर 2020 राेजी रात्री शेख यांनी कारमध्येच अत्याचार केला. आपण प्रतिकारही केला. मात्र, ताेंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने केलेले आराेप मेहबूब शेख यांनी समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया देत फेटाळले हाेते.

मेहबूब शेख कोण आहेत?

मेहबुब शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत

मुळचे बीड जिल्ह्यातील शिरुर कासार इथले रहिवासी

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर परिचय

इतर बातम्या :

मंदिरं खुली होणार, पण 6 फुटाचं अंतर पाळावं लागणार, ना प्रसाद, ना मुर्तीला स्पर्श, वाचा 17 मोठे नियम

maharashtra health department recruitment 2021 | आरोग्य विभागाची भरती परीक्षा पुढे ढकलली ! तांत्रिक अडचणींमुळे निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

PM Modi in US : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात दीड तास चर्चा, 5 महत्वाचे मुद्दे

(ready to face police enquiry once again said rape case accused mehbub shaikh)