मंदिरं खुली होणार, पण 6 फुटाचं अंतर पाळावं लागणार, ना प्रसाद, ना मुर्तीला स्पर्श, वाचा 17 मोठे नियम

 ठाकरे सरकारनं अखेर राज्यातली मंदिरं तसच इतर धार्मिक स्थळं खुली करण्याची घोषणा केलीय. गेल्या वर्षभरात जवळपास कोविडच्या ह्या संपूर्ण काळात महाराष्ट्रातली सर्व धार्मिक स्थळं बंदच आहेत. सरकारच्या घोषणेनंतर ती 7 ऑक्टोबरपासून उघडली जातील.

मंदिरं खुली होणार, पण 6 फुटाचं अंतर पाळावं लागणार, ना प्रसाद, ना मुर्तीला स्पर्श, वाचा 17 मोठे नियम
temple reopens
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 1:04 AM

मुंबई : ठाकरे सरकारनं अखेर राज्यातली मंदिरं तसच इतर धार्मिक स्थळं खुली करण्याची घोषणा केलीय. गेल्या वर्षभरात जवळपास कोविडच्या ह्या संपूर्ण काळात महाराष्ट्रातली सर्व धार्मिक स्थळं बंदच आहेत. सरकारच्या घोषणेनंतर ती 7 ऑक्टोबरपासून उघडली जातील. त्यामुळे भक्त मंडळी एकाच वेळेस ठिकठिकाणी गर्दी करण्याची शक्यता आहेत. पण कोविडचं संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे धार्मिक स्थळं, त्यांची ट्रस्ट मंडळी, आणि प्रार्थनेसाठी येणाऱ्या मंडळींनी नेमके कोणते नियम पाळायचे याची नियमावलीच आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलीय. ती पुढील प्रमाणे. (maharashtra government allows temples and holy place to open from 7 october know all rules and guidelines)

1. धार्मिक स्थळांनी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर तसच स्क्रिनिंगची व्यवस्था करणं अनिवार्य

2. ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत, फक्त त्यांनाच धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रवेश

3.ज्यांनी मास्क घातलेला आहे किंवा तोंड झाकलेलं आहे त्यांनाच प्रवेश मिळेल

4.कोविड रोखण्यासाठी सुचना देणारे फलक लावणं अनिवार्य, तसच ऑडिओ व्हिडीओही धार्मिक स्थळांमध्ये टाईम टू टाईम लावले जावेत.

5. एखाद्या मंदिरात, धार्मिक स्थळात एकाच वेळी किती जणांना प्रवेश द्यायचा ते ट्रस्टनं ठरवायचं आहे. व्हेंटिलेशन, उपलब्ध जागा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. अर्थातच त्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय ठेवावा.

6. प्रत्येकानं बुटं, चप्पला वाहनातच सोडाव्यात. कुटुंबियांनी आणि प्रत्येकानं ते स्वतंत्र ठेवावेत.

7. धार्मिक स्थळाच्या परिसरातली दुकानं, कॅफेटेरिया, स्टॉल्सनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं

8. येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रॉपर मार्किंग करावी.

9. धार्मिक स्थळांमध्ये आत आणि बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग असावेत.

10. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करताना दोघात कमीत कमी 6 फुटाचं अंतर असावं. याची जबाबदारी धार्मिक स्थळांच्या मॅनेजमेंटची असेल.

11. लोकांनी प्रवेश करण्यापूर्वी साबनानं हात धुवावीत, सॅनिटायजर मारावा.

12. धार्मिक स्थळांमध्ये बसताना सोशल डिस्टन्सिंग पाळला जावं. परिसरात जास्तीत जास्त मोकळी हवा राहील याची काळजी घ्यावी. एअर कंडिशन 24 ते 30 अंश सेल्सि. एवढं ठेवावं.

13. मुर्ती, धार्मिक ग्रंथ, पुतळे यांना हात लावता येणार नाही.

14. धार्मिक स्थळांवर कुठलंही मोठं कार्य ज्यामुळे गर्दी होईल असं करता येणार नाही.

15. भजन, किर्तन किंवा इतर धार्मिक गायन पूर्णपणे बंद असेल. पण धार्मिक गीतं वाजवता येतील.

16. कॉमन प्रार्थना चटई टाळावी. भक्तांनी त्यांची स्वत:ची चटई किंवा तत्सम कापड सोबत घेऊन यावे.

17. धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद वाटणे, तुषार शिंपडणे अशा गोष्टी पूर्णपणे बंद असतील

इतर बातम्या :

कलादालनातून मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन व्हावे, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

UPSC Result 2021 | युपीएससीत लातूरच्या सेव्हनस्टार्सचे अभूतपूर्व यश, जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

maharashtra health department recruitment 2021 | आरोग्य विभागाची भरती परीक्षा पुढे ढकलली ! तांत्रिक अडचणींमुळे निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

(maharashtra government allows temples and holy place to open from 7 october know all rules and guidelines)

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.