कलादालनातून मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन व्हावे, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

या रंगभूमी संग्रहालयाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीचा गौरवशाली इतिहास, रंगभूमीची वैशिष्ट्ये आणि वैभवशाली वाटचाल दृष्टिपथात येणे आवश्यक आहे. मराठी रंगभूमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभूमी समाजाबरोबर चालणारी आहे.

कलादालनातून मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन व्हावे, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 12:16 AM

मुंबई : महाराष्ट्राला रंगभूमीचा समृध्द इतिहास असून हा इतिहास आणि वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्र येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी रंगभूमी कलादालनातून मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन होईल या पध्दतीने या कलादालनाचे काम व्हावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. (The glorious tradition of Marathi theater should be seen from the art gallery, said the Chief Minister)

मराठी रंगभूमी कलादालनाच्या उभारणी संदर्भातील बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, सर्वश्री अभिनेते राजन भिसे, विजय केंकरे, ऋषिकेश जोशी, नाट्य दिगदर्शक वामन केंद्रे, अभिनेत्री सई गोखले, ऑनलाईन पद्धतीने अभिनेते सुबोध भावे, यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबधित अधिकारी उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले की, या रंगभूमी संग्रहालयाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीचा गौरवशाली इतिहास, रंगभूमीची वैशिष्ट्ये आणि वैभवशाली वाटचाल दृष्टिपथात येणे आवश्यक आहे. मराठी रंगभूमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभूमी समाजाबरोबर चालणारी आहे. त्यामुळे मराठी रंगमंच कलादालनातून प्रेक्षकांना मराठी रंगभूमीची वाटचाल अनुभवता येण आवश्यक आहे. रंगभूमी कलादालन स्वयंपूर्ण आणि सक्षम होण्याबरोबरच नवीन पिढीलाही बांधून ठेवेल असे असणे आवश्यक आहे.

मराठी रंगमंच कलादालन येथे येणाऱ्या प्रेक्षकांसाठीआकर्षणाचे केंद्र तर व्हावेच, पण त्याचबरोबर रंगभूमीची वाटचाल उलगडवून दाखवणारे उत्तम असे संग्रहालय साकारण्यात यावे. कलादालनामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास दृकृ-श्राव्य संग्रहालय, त्रिमिती सादरीकरणाची व्यवस्था याबरोबरच रंगभूमीच्या वाटचालीशी निगडीत शासनाच्या विविध विभागांकडे उपलब्ध संदर्भ, दस्तऐवज आदी गोष्टींबाबत समन्वय साधण्याचे आणि या कामाला वेग देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

संहिता विकास समितीची स्थापना

कलादालनाच्या निर्मितीकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली संहिता विकास समितीची (कंटेंट डेव्हलपमेंट कमिटी) स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय लवकरच हेरिटेज कमिटी(पुरातत्व समिती)ची स्थापनाही करण्यात यावी. मराठी रंगमंच कलादालनात नाटकाचा उगम ते आतापर्यंतचा प्रवास उलगडला जावा, संगीत, व्यावसायिक, प्रायोगिक रंगभूमी, दलित, कामगार नाट्य चळवळ आणि त्याची वैशिष्ट्ये माहित व्हावीत, जेष्ठ मराठी नाटककार, नेपथ्यकार, लेखक, नाट्य कलावंत यांचीही माहिती येथे उत्तम मांडणीतून उपलब्ध व्हावी असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

नाटक कलेच्या इतिहासात महाराष्ट्रातील रंगभूमीचे विशेष स्थान

भारतीय नाटक कलेच्या इतिहासात महाराष्ट्रातील रंगभूमीचे विशेष स्थान आहे. महाराष्ट्रातील नाट्य चळवळीचा इतिहास दीडशे वर्षांहून अधिक आहे. आधुनिक नाटकांची चळवळ महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीबरोबरच सुरु असून या नाट्य परंपरेचे संग्रहालयाच्या रुपाने जतन होणे आवश्यक आहे. या संग्रहालयात नवीन इमारत आणि त्यामध्ये नाट्य परंपराच्या इतिहासाचे विविध टप्पे दर्शविणारी अनेक दालने उभारण्यात येणार आहेत. विशिष्ट काळातील नाटकांबद्दलची माहिती, छायाचित्रे, पॅनल्स, दृकश्राव्य माध्यमे, होलोग्राफीक टेक्नॉलॉजीचा वापर करुन प्रदर्शित करण्यावर कसा भर देण्यात येणार आहे याबाबतचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. (The glorious tradition of Marathi theater should be seen from the art gallery, said the Chief Minister)

इतर बातम्या

UPSC Result 2021 | युपीएससीत लातूरच्या सेव्हनस्टार्सचे अभूतपूर्व यश, जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

चंद्रपूरच्या आदित्य जीवनेची युपीएससीत उज्वल कामगिरी, परिक्षेत 399 वे रँक मिळवले

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.