AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhavesh Kaware : मुंबईत मांसाहार-शाकाहार वाद पेटला; वरुण सरदेसाईंच्या टीकेला भावेश कावरेचं मोजक्या शब्दात प्रत्युत्तर, थेट दिला छत्रपती शिवरायांचा दाखला

मुंबईत पुन्हा एकदा मांसाहार-शाकाहार वाद पेटला आहे. मांसाहार करणाऱ्यांना घर नाकारणाऱ्या जाहिरातीवरुन केलेल्या वरुण सरदेसाईंच्या टीकेला कावरने प्रत्युत्तर दिलं आहे.

Bhavesh Kaware : मुंबईत मांसाहार-शाकाहार वाद पेटला; वरुण सरदेसाईंच्या टीकेला भावेश कावरेचं मोजक्या शब्दात प्रत्युत्तर, थेट दिला छत्रपती शिवरायांचा दाखला
| Updated on: Aug 13, 2026 | 2:26 PM
Share

रिअल इस्टेट एजंट, रीलस्टार भावेश कावरेच्या एका जाहिरातीवरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. एका इमारतीतील फ्लॅट विक्री मटण-मच्छी करणाऱ्यांना केला जाणार नाही, असे त्याने जाहिरातीतून सांगितले आहे. त्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर टीकेचा भडिमार होऊ लागला आहे. आमदार वरुण सरदेसाई यांनीही अशा दलालांना ठोकलं पाहिजे, अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे. वरुण सरदेसाई यांच्या टीकेला आता भावेश कावरेने प्रत्युत्तर दिलं आहे.

भावेश कावरने टीव्ही9 मराठी वृत्त वाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी जाहिरातीवर स्पष्टीकरण दिलं. त्याने तो फ्लॅट वारकरी व्यक्तीचा असल्याचे सांगितले. त्यानंतर मालकाला केवळ शाकाहारी व्यक्तीला फ्लॅट विकण्याची इच्छा असल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले. त्यानंतर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर कावरेने दिलं आहे. ‘मुंबईत 80 टक्के लोक मांसाहारी आहेत. मी स्वत: मांसाहारी आहे. तिथेच 20 टक्के शाकाहारी आहेत. ते शाकाहारी विक्रेत्याकडे लक्ष केंद्रीत करत आहेत. आता शाकाहारी व्यक्तींवर बळजबरी करणार आहेत का? वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे की, या दलालांना पकडा आणि ठोका. एक महान नेता हा युवाला असं बोलतो, हे कितपत चांगलं आहे? त्यांचं किती योग्य आहे का? असा उलट सवाल कावरेने केला आहे.

वादग्रस्त जाहिरातीचं समर्थन देताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांही संदर्भ दिला. त्याने म्हटलं की, ‘ज्यांची त्यांची श्रद्धा आहे, त्यांना मी दुखावणार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मावळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शाकाहारी आणि मासांहारी देखील होते. तेव्हा शाकाहारी लोकांना त्रास देत नव्हते. शाकाहारी लोकांना मासांहारी करण्यास बळजबरी करत नव्हते. त्या काळात पकडून ठोकण्याची भाषा केली जात नव्हती’.

‘मी या मानसकितेचे समर्थन करत नाही. परंतु महाराष्ट्रात शाकाहारी व्यक्तीही आहेत. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. एखाद्या ऑफिसमध्ये जेवायला बसतात, तेव्हा समोरचा शाकाहारी असेल. त्यावेळी दुसऱ्याने मांसाहारी जेवण आणलं असेल. तर एक व्यक्ती टेबल बदलतो. त्यानंतर दुसरीकडे जाऊन बसतो, असे त्यांनी सांगितले. ‘मी तर आता चिकन पिझ्झा खातानाी व्हिडिओ बनवणार नाही. मुंबईत शुद्ध शाकाहारी हॉटेल चालवले जातात. त्यांनीही मांसाहारी विक्री सुरू करायची का? असा सवाल देखील त्याने पुढे उपस्थित केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?