कर्तव्य बजावताना मृत्यू, पोलीस कुटुंबातील 24 जणांची अनुकंपा तत्वावर भरती

कर्तव्यावर असताना सांगलीत विविध कारणांनी मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळालाय.

कर्तव्य बजावताना मृत्यू, पोलीस कुटुंबातील 24 जणांची अनुकंपा तत्वावर भरती
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 5:02 PM

सांगली : कर्तव्यावर असताना सांगलीत विविध कारणांनी मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळालाय. सांगली पोलीस विभागाने मृत पोलीस कुटुंबातील 24 जणांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात भरती करुन घेतलंय. संबंधित पोलीस कुटुंबांतील सदस्यांना याबाबतचे नियुक्ती प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले (Recruitment of Police relatives after employee death in Sangli).

2018 पासून सांगली पोलीस दलात सेवेत असणाऱ्या 27 पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांचा विविध कारणांनी सेवा बजावताना मृत्यू झाला. दरम्यान कोरोना काळातही 6 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी संबंधित नातेवाईकांनी त्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात नोकरी मिळावी यासाठी अर्ज केले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाकडून पोलीस दलातील अशा मृत्यू झालेल्या पाल्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली पोलीस दलातील 27 पैकी 24 जणांची भरती झाली आहे. पोलीस मुख्यालय परिसरात दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या हस्ते मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील 24 मुला-मुलींना शिपाई पदाचं नियुक्तीपत्र देण्यात आलं. अत्यंत भावनिक असा हा छोटेखानी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांसह पोलीस कुटुंबीय मोठ्या संख्येने हजर होते.

अनुकंपा तत्वाखाली शासकीय सेवेत नोकरी मिळणे तसे खूप कठीण होऊन बसलेय. मात्र राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतल्याने अनेक कुटुंबांना मोठा दिलास मिळालाय. सांगली पोलीस दलाने या भरतीच्या निर्णयाबाबत तत्परता दाखवली आणि पोलीस कुटुंबातील 24 जण आज पोलीस दलात रुजू झाले आहेत. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर या सर्वांना सेवा बजवण्यासाठी तैनात करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

चोर पोलिसांना घाबरले, पोलीस चोरांना घाबरले; मग काय घडलं? वाचा!

एक फोटो, 4 महिला पोलीस अधिकारी आणि एक लाजवाब कामगिरी

शेतकऱ्यांना रोखताय की संपवताय? पोलिसांचा ‘गालिचा’ संतापजनक?

व्हिडीओ पाहा :

Recruitment of Police relatives after employee death in Sangli

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.