शेतकऱ्यांना रोखताय की संपवताय? पोलिसांचा ‘गालिचा’ संतापजनक?

दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांनी आता वेगळ्या मार्गांचा उपयोग सुरु केलेला दिसतोय.

शेतकऱ्यांना रोखताय की संपवताय? पोलिसांचा 'गालिचा' संतापजनक?

नवी दिल्ली : दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांनी आता वेगळ्या मार्गांचा उपयोग सुरु केलेला दिसतोय. पोलिसांनी दिल्ली बाहेरील आंदोलकांचे ट्रॅक्टर आणि गाड्या दिल्लीत येऊ नये म्हणून टिकरी बॉर्डरवर थेट रस्त्यावर खिळ्यांचा गालिचाच पसरलाय. त्यामुळे वाहनांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे टायर फुटतील अशीच ही व्यवस्था आहे. मात्र, आधीच बॅरिकेट्स लावलेले असताना ट्रॅक्टर उलटून एका आंदोलकाचा मृत्यू झालेला असल्याने पोलिसांच्या या कृतीचा विरोधही होत आहे (Police use nails on roads to stop Farmer Protesters on Delhi Border).

पोलिसांनी आधी दिल्ली सीमेवरील रस्ते जेसीबीने खोदले आणि त्यानंतर रस्त्यावर सिमेंटचा उपयोग करुन खिळे लावले. त्यामुळे या रस्त्यांवर खिळ्यांचा गालिचा पसरलाय. गाझीपूर सीमा शेतकरी आंदोलनाचं केंद्र बनलंय. या ठिकाणी सातत्याने वाढत्या आंदोलक शेतकऱ्यांची संख्या पाहता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. रात्रीतून 12 स्तराचं बॅरिकेटिंग करण्यात आलंय. याशिवाय नोएडा सेक्टरमधून अक्षरधाम मंदिराकडे जाणारा रस्ता देखील बंद करण्यात आलाय.

दरम्यान, याआधी पोलिसांनी शेतकरी आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न केला. याचाच भाग म्हणून शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अटकेसाठी हालचालीही झाल्या. मात्र, टिकैत यांचा दबावातून रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. शेतकरी आंदोलनाला वेग आलाय. त्यामुळे सरकारवरील दबाव चांगलाच वाढलाय. त्यामुळेच सरकारने पोलीस प्रशासनाला शेतकरी आंदोलन बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

याआधी दिल्लीच्या सीमेवर गाझीपूर, टिकरी आणि सिंधु बॉर्डरच्या आजूबाजूच्या परिसरात 31 जानेवारी रात्री 11 वाजेपर्यंत इंटरनेट बंदीही केली होती. तसेच दिल्लीला उत्तर प्रदेशशी जोडणारा राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला होता.

हेही वाचा :

शरद पवारांकडून 9 ट्विट्सची मालिका, केंद्रीय मंत्र्यांची झाडाझडती

शेतकरी आंदोलनादरम्यान सुरक्षा रक्षकांकडून कडेकोट बंदोबस्त, पाहा फोटो

‘कृषी कायदे परत घेतले नाही, तर आत्महत्या करेन,’ शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा इशारा

व्हिडीओ पाहा :

Police use nails on roads to stop Farmer Protesters on Delhi Border

Published On - 11:00 pm, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI