‘कृषी कायदे परत घेतले नाही, तर आत्महत्या करेन,’ शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा इशारा

'कृषी कायदे परत घेतले नाही, तर आत्महत्या करेन,' शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा इशारा

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अटकेच्या नावाखाली आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 28, 2021 | 9:49 PM

नवी दिल्ली : सरकार पोलीस प्रशासनाच्या मदतीने शेतकरी आंदोलन दडपत आहे, असा गंभीर आरोप शेतकरी नेत्यांकडून होत आहे. त्यातच आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अटकेच्या नावाखाली आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. यानंतर शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी तणाव वाढलाय. “जीव देईन, पण इथून हटणार नाही. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही. कृषी कायदे मागे घेतले नाही, तर मी आत्महत्या करेन,” अशीही तीव्र प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी व्यक्त केलीय. ते उत्तर प्रदेश सरकारने आंदोलन बंद करत जागा रिकामी करण्याचे आदेश दिल्यानंतर माध्यमांशी बोलत होते (Rakesh Tikait warn about suicide if Farm Laws not withdrawal).

राकेश टिकैत म्हणाले, “देशातील शेतकऱ्यांसोबत अन्याय होतोय. लाल किल्ल्यावर मोदींसोबत फोटो काढणाऱ्याने फडकावला. त्याच्यावर कारवाई व्हावी. पोलीस दडपशाही करत आहेत. गावांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी घाबरु नये. नवे कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही. ज्या मागणीसाठी इथं आलो आहोत ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. शेतकरी आंदोलन सुरुच राहिल.”

“भाजप शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहे. आम्ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही. हे कायदे सरकारला मागे घ्यावे लागतील. जर कायदे मागे घेतले नाही, तर राकेश टिकैत आत्महत्या करेल. आम्ही आंदोलनाची जागा रिकामी करणार नाही. आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांना मारण्याचं षडयंत्र रचलं जातंय. भाजपचे लोक आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना मारण्याचा कट रचत आहेत. भाजपचे आमदार आंदोलनस्थळावर आलेत. त्याचे 300 लोकं काठी आणि बंदुका घेऊन इथं हजर आहेत. त्यांच्यासोबत 2000 पोलीसही इथं आहेत,” असंही राकेश टिकैत यांनी नमूद केलं.

शेतकरी नेते नरेश टिकैत म्हणाले, “सरकार शेतकऱ्यांवरही लाठीचार्ज करेल. हे षडयंत्र आहे. याचा तपास झाल्यास सर्व उघड होईल. लोक शेतकऱ्यांना पळून जाण्यास सांगत आहेत. मी कुठेही जाणार नाही, इथंच राहणार आहे. आमचं पाणी, वीज सर्व बंद करण्यात आलंय. त्यांनी आमचं पाणी बंद केलंय, पण आम्ही आमच्या गावावरुन पाणी घेऊन येऊ. जिल्हा प्रशासनाने जबरदस्तीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, तर मी फाशी घेऊन आत्महत्या करेल.”

“सध्याच्या परिस्थितीत सरकार एफआयआर करुन काय सिद्ध करु पाहत आहे? हे आंदोलन संपणार नाही, उलट यामुळे आंदोलनाची धार वाढेल. लाल किल्ल्याची सुरक्षा होत नाहीये. याचा तपास व्हावा आणि दूधाचं दूध आणि पाण्याचं पाणी व्हावं. लालकिल्ला आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे आम्ही त्याला नुकसान का करु? आमचं आंदोलन सुरुच राहिल. लालकिल्ला प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. लालकिल्ल्यातील घटनेत सहभागी दीप सिद्धूचा सामाजिक बहिष्कार करण्यात आलाय,” असंही राकेश टिकैत यांनी नमूद केलं.

‘हाच योगी सरकारचा खरा चेहरा’

राकेश टिकैत यांनी यावेळी उत्तर प्रदेश सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “उत्तर प्रदेश पोलीस आंदोलनाच्या ठिकाणी अटकसत्राचा प्रयत्न करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील शांततापूर्ण आंदोलन करणं शेतकऱ्यांचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशच्या गाझीपूर बॉर्डरवर कोणतीही हिंसेची घटना झालेली नाही. तरीही सरकार इथं दडपशाही करत आहे. हाच उत्तर प्रदेश सरकारचा खरा चेहरा आहे.”

“रात्रीच्या वेली कुणाशीही चर्चा होणार नाही. जे बोलायचं आहे ते दिवसा बोलण्यात येईल. भाजपचा कोणताही नेता आला, तर त्याला इथं बंधक बनवू.” दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. त्यांनी गाझीपूरच्या दोन कंपन्या आंदोलनस्थळावर तैनात केल्या आहेत.

हेही वाचा :

Farmer Protest : योगी सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी आंदोलन बंद करण्याचे आदेश, गाझियाबादमध्ये कलम 144 लागू

शेतकरी आंदोलनाला स्थानिकांच्या विरोधाचा दावा, गावकरी नाही, तर भाजप कार्यकर्ते, आंदोलकांनी दावा फेटाळला

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात नंदुरबारच्या शेतकरी महिलेचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

Rakesh Tikait warn about suicide if Farm Laws not withdrawal

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें