शेतकरी आंदोलनाला स्थानिकांच्या विरोधाचा दावा, गावकरी नाही, तर भाजप कार्यकर्ते, आंदोलकांनी दावा फेटाळला

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला विरोध होत असल्याचा दावा करण्यात आलाय.

शेतकरी आंदोलनाला स्थानिकांच्या विरोधाचा दावा, गावकरी नाही, तर भाजप कार्यकर्ते, आंदोलकांनी दावा फेटाळला
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 4:49 PM

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला विरोध होत असल्याचा दावा करण्यात आलाय. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला आणि परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनावरुन हा विरोध होत असल्याचंही सांगितलं जातंय. मात्र, प्रत्यक्षात आंदोलन करणाऱ्यांकडून हा दावा फेटाळण्यात आलाय. दिल्ली सीमेवरील भाजपशासित हरियाणातील गावांवर मनोहरलाल खट्टर सरकारचा दबाव आहे. या गावांमधील काही मोजके भाजप कार्यकर्ते शेतकरी आंदोलनाला विरोध करत आहेत, असं मत शेतकरी आंदोलनातील नेत्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केलंय (Some people opposing Farmer Protest after Violence in Delhi protester say they are BJP activist).

दिल्लीच्या सीमेवर काही ठिकाणी काही लोकांनी शेतकरी आंदोलनाला विरोध केला. 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेली हिंसा आम्हाला मान्य नाही, असं मत या विरोधकांनी व्यक्त केलंय. तसेच आंदोलनाची जागा रिकामी करावी अशीही मागणी करण्यात आली. हा विरोध करणाऱ्यांकडून आंदोलन सुरु असलेल्या गावांकडून विरोध होत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, शेतकरी आंदोलनातील नेत्या प्रतिभा शिंदे यांनी हा दावा फेटाळला आहे. तसेच विरोध करणारे 8-10 लोक म्हणजे गावकरी नसून भाजपचे कार्यकर्ते आहेत, असं म्हटलंय.

सिंगु बॉर्डरवर शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी गावकऱ्यांचा विरोध असल्याचा मुद्दा फेटाळला. त्या म्हणाल्या, “हरियाणाच्या खट्टर सरकारने आंदोलन सुरु असलेल्या गावांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही आंदोलकांना पाणी, अन्न, वीज किंवा इतर सुविधा पुरवू नका, अन्यथा तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीला कोणताही निधी देणार नाही, अशी धमकी दिली जात आहे. आंदोलन स्थळावर स्वच्छता करणाऱ्यांना पाठवू दिले जात नाहीये. याशिवाय संबंधित गावातील भाजपचे कार्यकर्ते शेतकरी आंदोलनाला विरोध करत आहेत. ते 8-10 लोकं म्हणजे संपूर्ण गाव असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, तसं नाहीये. सरकारचा प्रचंड दबाव असूनही आजूबाजूच्या गावांमधील लोक पाठिंबा देत आहेत.”

आंदोलकांना अन्न मिळू नये म्हणून सरकारकडून नाकेबंदी, शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न

“दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून पोलिसांचा वापर होतोय. आंदोलकांना पाणी, जेवण मिळू नये यासाठी आंदोलनाच्या चहू बाजूंनी 2 किलोमीटरनंतर नाकेबंदी करण्यात आलीय. त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून कुणालाही येऊ दिले जात नाही किंवा जाऊ दिले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जेवणापासून अनेक गोष्टींचा तुटवडा येत आहे,” असंही प्रतिभा शिंदे यांनी म्हटलंय.

सिंगु बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्ष दलाची तैनाती करण्यात आलीय. दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकेत यांना नोटीस दिलीय. 3 पानांच्या या नोटीसमध्ये 4 मुद्द्यात म्हटलं आहे, “शेतकरी संघटना आणि पोलिसांमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्याबाबत काही नियम ठरले होते. मात्र, आंदोलकांनी बेजबाबदारपणे नियमांचं उल्लंघन केलं.”

हेही वाचा :

हिंसक ट्रॅक्टर मार्चने शेतकरी आंदोलनाच्या अडचणीत वाढ, संसद घेराव रद्द होणार?

Fact Check : दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीला भडकवण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दिप सिद्धुचं भाजप कनेक्शन? वाचा सविस्तर

शेतकरी आंदोलनावर लाठीचार्ज करुन सरकारने आपली जागा दाखवली : राजू शेट्टी

व्हिडीओ पाहा :

Some people opposing Farmer Protest after Violence in Delhi protester say they are BJP activist

Non Stop LIVE Update
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?.
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा.
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा.
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल.
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका.
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल.
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?.
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?.
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?.