5

Farmer Protest : योगी सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी आंदोलन बंद करण्याचे आदेश, गाझियाबादमध्ये कलम 144 लागू

योगी आदित्यनाथ सरकारने दिल्ली सीमेवर उत्तर प्रदेशच्या भागात सुरु असलेले शेतकरी आंदोलन बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश दिलेत.

Farmer Protest : योगी सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी आंदोलन बंद करण्याचे आदेश, गाझियाबादमध्ये कलम 144 लागू
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 8:54 PM

नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ सरकारने दिल्ली सीमेवर उत्तर प्रदेशच्या भागात सुरु असलेले शेतकरी आंदोलन बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश दिलेत. यानंतर गाझियाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांना आंदोलनाचं ठिकाण रिकामं करण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र, शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. सिंघु बॉर्डरवर पायी जाण्यासाठी असलेला एकमेव मार्गही बंद करण्यात आलाय. आजूबाजूच्या गावांमधून सिंघु सिंघु बॉर्डरकडे येणाऱ्या गल्ल्या देखील बंद करण्यात आल्यात. त्यामुळे शेतकऱ्यांची अन्नपदार्थ आणि इतर गोष्टींचा पुरवठा देखील बंद झाल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलाय. गाझियाबाद प्रशासनाने गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी नेते आणि भाकियूचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना आंदोलन स्थळ रिकामं करण्याबाबत नोटीस दिलीय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय (UP Yogi Government order DM to stop Farmer Protest of Every district).

गाझीपूर बॉर्डरवर पॅरा मिलिट्री जवानांची संख्या वाढवण्यात आलीय. उत्तर प्रदेश सरकारने सर्व जिल्ह्यांमधील शेतकरी आंदोलन बंद करण्याचे आदेश दिलेत. याबाबत सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलन बंद होईल यासाठी उपाययोजना करण्यास सांगितलंय. यानंतर पोलीस प्रशासनाने गाझीपूर येथे बंदोबस्त वाढवत आंदोलनाची जागा रिकामी करण्यास सांगितलंय. मात्र, शेतकऱ्यांनी याला विरोध केलाय.

गाझीपूर बॉर्डरवर जिल्हा प्रशासनाने राकेश टिकैत यांना नोटीस दिलीय. यावर राकेश टिकैत यांनी आंदोलन बंद होणार नाही असं स्पष्ट केलंय. ते म्हणाले, “मी गोळ्या खाईल, पण इथंच राहिल. हिंमत असेल तर अटक करुन दाखवा. आंदोलनाच्या ठिकाणी काही घडलं तर त्याची पूर्ण जबाबदारी पोलिसांची असेल.”

शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी म्हणाले, “जबरदस्तीने शेतकरी आंदोलन बंद होणार नाही. आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई सुरुच राहिल. सध्या आम्ही काहीही ठरवलेलं नाही. आम्ही बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ. यात सरकारचं काय षडयंत्र आहे हे सध्या लक्षात येत नाहीये.”

हेही वाचा :

शेतकरी आंदोलनाला स्थानिकांच्या विरोधाचा दावा, गावकरी नाही, तर भाजप कार्यकर्ते, आंदोलकांनी दावा फेटाळला

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात नंदुरबारच्या शेतकरी महिलेचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

UP Yogi Government order DM to stop Farmer Protest of Every district

Non Stop LIVE Update
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...