AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्र होताच 10 गावांवर ड्रोनच्या घिरट्या, सांगलीत प्रचंड दहशत; शेवटी पोलीसांना..

ड्रोन गावावर घिरट्या घालत असल्याने त्यांना पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर आल्याने सर्वत्र गोंधळ उडाला आहे. गावातील लोक आप-आपल्या परीने या विषयी विविध तर्क आणि वितर्क मांडू लागल्याने आणखीनच दहशत पसरली आहे.

मध्यरात्र होताच 10 गावांवर ड्रोनच्या घिरट्या, सांगलीत प्रचंड दहशत; शेवटी पोलीसांना..
drone flying at night in sangli-miraj
| Updated on: Sep 12, 2024 | 6:56 PM
Share

सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागात सुमारे आठ ते दहा गावांवर मंगळवारी रात्री ड्रोन घिरट्या घालू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. चोरीच्या संशयामुळे सर्व गावांतील शेकडो तरुण आणि ग्रामस्थ रस्त्यांवर रात्रभर गस्त घालत होते.गावात चोरीच्या उद्देश्याने हे ड्रोन फिरत असल्याची अफवा पसरल्याने अनेकांची तर रात्रीची झोपच उडाली. गावातील तरुणांना रात्रीची गस्त सुरु केल्याने आणि मोबाईल व्हॉट्स ग्रुपवरुन चोरीच्या संदर्भातील विविध अफवांची यात भर पडल्याने गावातील लोकांत मोठी दहशत पसरली होती. मात्र या ड्रोनच्या उडण्यामागील खरे कारण आता समोर आले आहे. हे कारण ऐकूण आता गावकऱ्यांना आपल्या जमिनीची चिंता वाटू लागली आहे.

सांगलीतीर मिरज पूर्व भागातील टाकळी, बोलवाड, बेडग, आरग, मल्लेवाडी, एरंडोली, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी या गावात गेले काही दिवस रात्री सुमारे नऊच्या सुमारास ड्रोन अचानक घिरट्या घालू लागल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण पसरली आहे.त्यामुळे लहान मुले आणि महिलांमध्ये गोंधळ उडाला आहे. गावांमध्ये चोरीच्या उद्देशाने हे ड्रोन पाळत ठेवण्यासाठी घिरट्या घालत असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शेकडो तरुण रस्त्यावर उतरून चोरांचा बंदोबस्त करण्याच्या उद्देश्याने पहारा देऊ लागले आहे. सर्व व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज फिरू लागले त्यामुळे थोड्याच अवधीमध्ये गावावर ड्रोन फिरत असल्याचे बातमी सर्वत्र पसरली. महिला आणि ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी या गावांना भेट देऊन घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे ध्वनीक्षेपकावरून आवाहन केले. त्यानंतरही या सर्व गावातील शेकडो ग्रामस्थ रात्रभर गस्त घालत जागेच राहिले होते. मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी ड्रोनची तपासणी सुरु असून ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये. जर कोणाला ड्रोन‌ आढळला तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.

अखेर ड्रोन उडवणारा सापडला

गेल्या काही दिवसापासून सांगली जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या उडणाऱ्या ड्रोनमुळे लोकांमध्ये मोठी दहशत पसरली होती.अनेक ठिकाणी चोरीचे प्रकार देखील घडल्याने ग्रामस्थ भयभीत होते. रात्रीचे ड्रोन उडवून चोऱ्या होत असल्याची अफवा पसरल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसापासून पोलिस याचा तपास करीत होते. ड्रोन उडवणारी टोळी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.काल दुपारी खानापूर तालुक्यातील माहुली येथे काही व्यक्ती ड्रोन उडवताना तेथील लोकांच्या निदर्शनास आल्या. या गावकऱ्यांनी त्यांना पकडून विटा पोलिसांच्या ताब्यात दिले. ड्रोन संदर्भात तक्रार आल्यानंतर काल असाच ड्रोन उडत होता. ग्रामस्थांनी ड्रोन उडविणाऱ्या पकडून आमच्या स्वाधीन केले, परंतू भारत सर्वांगीण या कंपनीतर्फे रस्त्याचा सर्वेसाठी ड्रोन उडवले जात असल्याचा निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक