साताऱ्यातील ‘या’ गावात विहिरी पेट्रोलने भरल्या, वाचा नेमकं काय झालं?

| Updated on: Mar 03, 2021 | 7:36 AM

पेट्रोल चोरून झाल्यानंतर चोरटे पाईपलाईन तशीच सोडून येथून निघून गेले. त्यामुळे गळती लागलेल्या पाईपलाईनमधून बाहेर पडत असलेले हजारो लीटर पेट्रोल जमिनीत मुरले. | Petrol and Diesel

साताऱ्यातील या गावात विहिरी पेट्रोलने भरल्या, वाचा नेमकं काय झालं?
मुंबई-पुण्याहून सातारा आणि सोलापूरकडे पेट्रोल वाहून नेण्यासाठी असलेल्या पाईपलाईनचा भाग सासवडमधून जातो. ही 223 किलोमीटरची पाईपलाईन आहे. चोरट्यांनी सासवड गावाजवळ या पाईपलाईनला भगदाड पाडले
Follow us on

सातारा: संपूर्ण देशात इंधनाचे भाव गगनाला भिडल्यामुळे आता चोरट्यांनी मौल्यवान वस्तुंप्रमाणे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवर (Diesel) डल्ला मारायला सुरुवात केली आहे. साताऱ्यातील सासवडमध्ये असाच एक प्रकार समोर आला. याठिकाणी चोरट्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईनच फोडली. त्यानंतर हजारो लीटर पेट्रोल घेऊन हे चोरटे पसार झाले. (Petrol and Diesel robbery in Maharshtra)

पेट्रोल चोरून झाल्यानंतर चोरटे पाईपलाईन तशीच सोडून येथून निघून गेले. त्यामुळे गळती लागलेल्या पाईपलाईनमधून बाहेर पडत असलेले हजारो लीटर पेट्रोल जमिनीत मुरले.

गावातील विहिरी पेट्रोलने भरल्या

मुंबई-पुण्याहून सातारा आणि सोलापूरकडे पेट्रोल वाहून नेण्यासाठी असलेल्या पाईपलाईनचा भाग सासवडमधून जातो. ही 223 किलोमीटरची पाईपलाईन आहे. चोरट्यांनी सासवड गावाजवळ या पाईपलाईनला भगदाड पाडले. यामुळे हजारो लिटर पेट्रोलचा जमिनीत निचरा झाला. मात्र, हिंदुस्थान पेट्रोलियमच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. ही पाईपलाईन फोडल्यानंतर वेळीच अलार्म वाजल्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे.

परंतु, पेट्रोल जमिनीत मुरल्याने चक्क दोन विहिरी या पेट्रोलने भरल्या आहेत. यामध्ये आजु बाजुच्या शेतांतील उभ्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. पाईपलाईनची गळती काढण्याचे काम यशस्वी झाले आहे. या घटनेचा तपास संबधित विभाग आणि लोणंद पोलीस करीत आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा काय आहे आजचे दर

देशातील बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पलीकडे गेलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून वाढत्या किंमतींचा ट्रेंड सुरू आहे. खरंतर, तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. आज थेट चौथ्या दिवशी (बुधवारीही) दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. (petrol diesel rate today 03 march 2021 know the new price of delhi mumbai and all cities)

बुधवारी पेट्रोल-डिझेलचे दर कालच्या दराइतकेच आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

संबंधित बातम्या :

नियम बदलले! LPG सिलिंडरसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय

इंधन दरवाढ होताच चोरांची चांदी, नवी मुंबईत गाडीतून पेट्रोल चोरीची घटना CCTV मध्ये कैद

पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा काय आहे आजचे दर

(Petrol and Diesel robbery in Maharshtra)