इंधन दरवाढ होताच चोरांची चांदी, नवी मुंबईत गाडीतून पेट्रोल चोरीची घटना CCTV मध्ये कैद

पेट्रोल चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत (Navi Mumbai Petrol Theft).

  • हर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 12:41 PM, 2 Mar 2021
इंधन दरवाढ होताच चोरांची चांदी, नवी मुंबईत गाडीतून पेट्रोल चोरीची घटना CCTV मध्ये कैद
Navi Mumbai Petrol Theft

नवी मुंबई : देशात पेट्रोलच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे (Navi Mumbai Petrol Theft). अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे. किंमती वाढल्यामुळे पेट्रोल चोरी जोमात आहे. नवी मुंबईतील खारघरमध्ये सोसायटीच्या गाड्यांमधून पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये आता वाढ झाली आहे. पेट्रोल चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत (Navi Mumbai Petrol Theft).

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या किमतीत वाढ होत असल्यामुळे चोरटे आता पेट्रोल चोरीकडे वळले आहेत. खारघर सेक्टर 34 मधील एका सोसायटीत चोरट्यांनी जवळपास पाच मोटारसायकल मधून पेट्रोल चोरी करुन पोबारा केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेराद्वारे उजेडात आला आहे.

पाच लिटर पेट्रोलची चोरी

गेल्या 13 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल शंभर रुपयांच्या उंबरठ्यावर असल्यामुळे चोरट्यांनी आता पेट्रोल चोरीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. खारघर सेक्टर 34 मधील स्काय लाईन होम्स या सोसायटीत एका चोरट्यांनी रात्री सोसायटीमधील जवळपास पाच मोटारसायकल मधून पाच लिटरहून अधिक चोरी केली आहे.

कारमधून पेट्रोल चोरीचाही प्रयत्न

तसेच, सोसायटीच्या व्हरांड्यात असलेल्या नवीन चप्पल देखील लंपास केल्याचे उघड झाले आहे. काही मोटार कारमधून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात चोरट्यांना यश आले नाही. ही चोरी पहाटे पाचच्या सुमारास केली असल्याचे समजले.

या विषयी सोसायटी पदाधिकारी दिलीप कांबळे म्हणाले, पहाटे पाच वाजेनंतर सुरक्षा रक्षक विश्रांतीसाठी गेल्यावर चोरट्यांनी पाच मोटार सायकल मधून पेट्रोल चोरी केले. तसेच, काहींच्या नवीन चप्पलाही घेवून पोबारा केल्याचे सीसीटीव्हीतून निदर्शनास आले आहे. या विषयी खारघर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार आणि व्हिडिओ क्लिप देण्यात आली असून पोलिसांनी याबाबत तक्रार नोंद करुन घेतली आहे.

नवी मुंबईत आज पेट्रोलचा दर काय?

आज नवी मुंबईत पेट्रोलचा दर 97 रुपये प्रती लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलचे दर 88.06 रुपये प्रती लिटर झाले आहेत.

Navi Mumbai Petrol Theft

संबंधित बातम्या :

Petrol Diesel Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी काय आहे पेट्रोलचा भाव? वाचा तुमच्या शहरातले दर