AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या नेत्याला केंद्रात अर्थमंत्रिपद?

Union Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असताना आता एका बड्या नेत्याने महाराष्ट्रातील नेत्याला केंद्रिय अर्थमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली आहे.

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या नेत्याला केंद्रात अर्थमंत्रिपद?
Modi cabinet reshuffelImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 26, 2026 | 9:33 PM
Share

गेल्या काही काळापासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. अशातच आता केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या आहे. विविध राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यातील नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच अलिकडेच उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यातील एका नेत्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील नेत्याला अर्थखातं मिळणार – रोहित पवार

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. रोहित पवार यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रातल्या भाजपच्या एका मोठ्या नेत्याला केंद्रात मोठ्या फायनान्स मिनिस्ट्रीचं पद दिल जाऊ शकत.’ रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांच्या विधानाचा अर्थ निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थखातं काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे.

फुटलेल्या एका खासदाराला मंत्रिपद मिळणार – रोहित पवार

रोहित पवार यांनी पुढे बोलताना म्हटले की, महाराष्ट्रात असा एक नेता आहे त्याच्याकडे छोट पद आहे. जो मंत्री आहे त्याला महाराष्ट्रात एक मोठं पद दिलं जाईल. तसेच जे सहा खासदार पलटी मारून पैसे घेऊन सत्तेत गेले त्यातील एका खासदाराला मंत्रीपद मिळू शकतं असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोणत्या नेत्याला थेट अर्थमंत्रिपदाची लॉटरी लागणार ते पाहणे महत्त्वाचे आहे.

राज्यातून कुणाला लागणार लॉटरी?

रोहित पवार यांचे विधान यामुळेही महत्त्वाचे आहे की, आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एका खासदाराला यात मंत्रि‍पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तसेच आम आदमी पार्टीतून भाजपात सामील झालेल्या खासदारांपैकी एखाद्याला मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांचा दावा खरा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता राज्यातून नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा