AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढे यांचे नाव घेत रोहित पवार यांचा MPSC आयोगाला मोठा इशारा, थेट..

एमपीएससी प्रकरणात रोहित पवार आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यातच मोठी अपडेट पुढे येत आहे. रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मोठा इशारा दिला. कागदपत्रे रद्दी काढून नष्ट करण्याची एवढी घाई का झाली आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तुकाराम मुंढे यांचे नाव घेत रोहित पवार यांचा MPSC आयोगाला मोठा इशारा, थेट..
Rohit Pawar and Tukaram Mundhe
| Updated on: Oct 15, 2026 | 8:38 AM
Share

MPSC आयोगातील कथित गैरप्रकारांवरून आमदार रोहित पवार यांनी आयोगाला पुन्हा मोठा इशारा दिला आहे. आंदोलन स्थगित झालं म्हणजे प्रकरण संपलं असं समजू नये, पेपरफुटीतील दोषींना सोडणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. अकरा दिवस विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करताना रोहित पवार दिसले. MPSC कडून जुनी कागदपत्रं नष्ट करण्याची घाई का, असा सवाल करत त्यांनी निर्णयावर आक्षेप घेतला. न्यायिक चौकशी पूर्ण होईपर्यंत जुनी कागदपत्रं नष्ट करण्यास स्थगिती देण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की,  MPSC आयोगातील महाभागांनी जास्त हुशारी करण्याचा प्रयत्नच करू नये. आंदोलन स्थगित झालं म्हणजे सर्व शांत झालं आणि आमचं लक्ष नाही, असं कुणीही समजू नये.

पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भविष्याची होळी करणाऱ्या कुणालाच आम्ही सोडणार नाही. चौकशी होऊद्या, पेपर फोडणारे सगळे घरी जातीलच.. MPSC ला जुनी कागदपत्रे रद्दी काढून नष्ट करण्याची एवढी घाई का झाली आहे? एवढा चक्रमपणा का? न्यायिक चौकशी आयोगाचा आणि तुकाराम मुंडेंच्या धाकाचा हा परिणाम आहे का? आयोगाचं संपूर्ण शुद्धीकरण करायचं असेल तर सर्व जुनी कागदपत्रं देखील तपासणं गरजेचं आहे, तरच सत्य बाहेर येईल.

त्यामुळं आयोगाच्या सचिवांनी किंवा सरकारने तत्काळ दखल घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत रद्दी नष्ट करण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याच्या सूचना द्याव्यात, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. रोहित पवार पुन्हा आक्रमक भूमिका घेत आहेत. रोहित पवारांच्या आंदोलनाला मोठे यश आले.

तुकाराम मुंढे चाैकशी समितीमध्ये आहेत. एमपीएससीचे आयुक्त भीमनवार रजेवर गेले आहेत. त्यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्ट केले की, जोपर्यंत चाैकशी होत नाही, तोपर्यंत मी रजेवर जात आहे. सुरूवातीला सांगण्यात आले की, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले पण त्यानंतर स्पष्ट झाले की, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले नाही.

Follow Us
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...