AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार रजेवर, आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्याने 10 मिनिटांत सूत्र फिरली, मध्यरात्री काय घडलं?

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्याने 10 मिनिटांत सूत्र फिरली, मध्यरात्री काय घडलं, जाणून घ्या

MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार रजेवर, आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्याने 10 मिनिटांत सूत्र फिरली, मध्यरात्री काय घडलं?
| Updated on: Oct 12, 2026 | 7:41 AM
Share

एमपीएसी विद्यार्थ्यांचे आंदोलन मध्यरात्री स्थगित करण्यात आलं. एमपीएससी परीक्षामधील गैरप्रकारची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांचा आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी रजेवर जाण्याची घोषणा केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मध्यरात्री चर्चा झाली. त्यानंतर भीमनवार यांनी रजेवर जाण्याची घोषणा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. आंदोलन संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडून पोलिसांचं टाळ्या वाजून अभिवादन करण्यात आलं. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांचे आभार मानले.

मध्यरात्री भीमनवार यांनी काय म्हटलं?

MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी मध्यरात्री पोस्ट करत म्हटलं की, एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केलीये. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिलंय. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतलाय. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल’.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं की, गेली अकरा दिवसापासून एमपीएससी चे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांसोबत सकारात्मक चर्चा करून आयोगाचे अध्यक्ष हे चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत रजेवर असणार आहेत. आमदार रोहित पवार, विश्वजीत कदम तसेच विद्यार्थी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आणि हे आंदोलन आता थांबलं आहे. सरकार विद्यार्थ्यांसोबत आहे’.

निर्णयावर विद्यार्थिनी नाराज 

सरकारच्या निर्णयावर एका विद्यार्थिनीने नाराजी व्यक्त केली आहे.  विद्यार्थिनीने म्हटलं की, गेली अकरा दिवसापासून विद्यार्थी रस्त्यावरती आहे माञ सरकारकडून विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत. राजीनामा हीच आमची मागणी होती मात्र राजीनामा झाला नाही.  रजेवर पाठवण्यात आलं आहे, परंतु सरकारने जर मनावर घेतलं असतं, तर राजीनामा घेतला असता. चौकशी केली जाईल आणि पुन्हा भिमनवार हे पदावरती येईल.त्यापेक्षा त्याला पदावरून हटवणे गरजेचं होतं पण ते दुर्दैवाने झालं नाही. आता साठ दिवसात पाहूयात काय होतंय. सरकार आमदार खासदारांकडून अनेक मतानुसार निर्णय घेऊ शकतात, तर हा निर्णय पण त्यांच्यासाठी मोठा नव्हता’.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'