AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवारांची तब्येत खालावली; बीपी, शुगर लो, डॉक्टरांकडून मोठी अपडेट, कुटुंबाच्या डोळ्यात पाणी

शेतकरी कर्जमाफीमधील अट हटवली जावी यासाठी रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे, त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, त्यांची तब्येत खालावली आहे.

रोहित पवारांची तब्येत खालावली; बीपी, शुगर लो, डॉक्टरांकडून मोठी अपडेट, कुटुंबाच्या डोळ्यात पाणी
रोहित पवार यांचं आमरण उपोषण Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 14, 2026 | 5:06 PM
Share

सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतु त्यामध्ये अशी अट घालण्यात आली आहे, की ज्या शेतकऱ्यांकडे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असेल अशा शेतकऱ्यांना जर दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांना दोना लाख रुपयांपेक्षा अधिकची जी रक्कम आहे, ती एकरकमी भरावी लागणार आहे. जर समजा एखाद्या शेतकऱ्यावर तीन लाख रुपयांचं कर्ज असेल तर त्याला जर या कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी आधी एक लाख रुपये भरावे लागणार आहे. सरकारच्या कर्जमाफीच्या याच अटीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार विरोध केला आहे. ही शेतकऱ्यांची कर्जमाफी नसून शेतकऱ्यांकडून वसुली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

सरकारने ही अट रद्द करावी आणि सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. आज त्यांचा अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालावली आहे. रोहित पवार यांचा बीपी आणि शुगर लो झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रोहित पवार यांना सलाईन लावण्यासाठी वैद्यकीय पथकाकडून तयारी सुरू आहे. परंतु त्यांनी सलाईन लावण्यास नकार दिला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांचा मला फोन आला आहे, ते दोन तासांमध्ये इथे येत आहेत. घरच्यांची मी माफी मागतो परंतु जोपर्यंत मंत्री इथे येत नाहीत आणि त्यांच्यासोबत माझी चर्चा होत नाही, तोपर्यंत मी ओआरएस घेणार नाही, किंवा सलाईन पण लावणार नाही. सरकारचे प्रतिनिधी इथे आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू, ते काही ठोस शब्द देतील असा मला विश्वास वाटतो असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, आई सुनंदा पवार आणि त्यांचा मुलगा देखील आंदोलनस्थळी आहेत, रोहित पवार यांचं कुटुंब भावुक झालं असून, डोळ्यात पानी आल्याचं पहायला मिळत आहे.

Follow Us
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक