
अजित पवार यांच्या निधानंतर AAIB चा अहवाल समोर आला. मात्र त्यातील अनेक मुद्यांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार, अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. आज सकाळी रोहित पवार यांनी पुन्हा एक पत्रकार परिषद घेत या रिपोर्टबद्दल अनेक खुलासे केले. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल करण्यात येणारी चौकशी, तपासासंदर्भात रोहित पवार यांनी आधीही नाराजी व्यक्त केली होती. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्दे मांडत अजित दादांच्या बाबतीत भेदभाव का असा सवाल उपस्थित केला आहे. त्यासाठी त्यांनी 2023 साली झालेल्या एका अपघाताचाही संदर्भ दिला.
काय म्हणाले रोहित पवार ?
2023 साली मुंबईत व्हीएसआरच्या लेअरजेटचा अपघात झाला होता. त्या इनव्हेस्टिगेशन टीममध्ये के. रामचंद्र हे इन चार्ज होते आणि इन्व्हेस्टिगेटर म्हणून आनंदन यांच् नाव दिलं होतं. पण अजित दादांचा अपघात जो झाला, त्या रिपोर्टमध्ये कोणत्याही इन्व्हेस्टिगेटरचं नाव लिहीलेलं नाही. कदाचित इन्व्हेस्टिगेटरच घाबरले असतील, असा दावा रोहित पवार यांनी केला. यात मॅनिप्युलेशन , कागदपत्रांची हेराफेरी आणि इतक्या गोष्टी होणार आहेत, तर नावचं देऊ नका, म्हणजे उद्या कोणावरही आक्षेप घ्यायला नको, अशी भूमिका असावी, असंही रोहित पवार म्हणाले.
2023 साली जो अपघात झाला, व्ही. के सिंग यांनी स्वत:च्या प्रायव्हेट ट्रकमध्ये ,विमान पडलं, ब्लॅकबॉक्सपासून सगळं स्वत: हाताळून दिल्लीला नेलं होतं असं आम्हाला कळलं आहे. मग अजित दादांच्या बाबीत इन्व्हेस्टिगेशन टीम का नाही असा प्रश्न आमच्या मनात आहे. हा भेदभाव दादांच्या बाबतीतच का केला जातो, ही शंकाही आमच्या मनात आहे, असं रोहित पवार म्हणाले.
विमान लँड करण्याची परवानगी कशी ?
या विमानाला बारामतीला जाण्याची परवानगी कशी दिली, टेक ऑफ करायला कसं दिलं असा सवाल वितारत एआयएबीने त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप रोहित पवारांनी केला. दोन्ही पायलट्सना बारामती विमानतळावर लँडिंगची माहिती होती. त्यांना 29 नंबर कुठला आणि 11 नंबर कुठला हे माहीत होतं. या रिपोर्टमध्ये तसं नमूद केलं आहे. ते बारामतीत अनेकदा लँड झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय असंही रोहित पवारांनी सांगितलं. व्हिजीबिलीटी नसताना विमान लँड करायचं नाही, असं त्यागी समितीने म्हटलं आहे. वायएसआर रेड्डी यांचं निधन झाल्यावर त्यागी समिती नेमली होती. त्या समितीने हा रिपोर्ट दिला होता. तरीही लँड करण्यात आलं, असा आरोप रोहित पवार यांनी केला