रोहित पवारांची कर्जत-जामखेड मतदारसंघात पाय रोवण्यास सुरुवात

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दुसरा नातू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यानंतर आता रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. रोहित पवार यांनी प्रथमच याबाबत जाहीर व्यक्तव्य केलं. विधानसभा लढवण्यास मी इच्छुक आहे. मात्र माझा मतदारसंघ ठरला नसून वरिष्ठ ठरवतील, …

रोहित पवारांची कर्जत-जामखेड मतदारसंघात पाय रोवण्यास सुरुवात

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दुसरा नातू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यानंतर आता रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. रोहित पवार यांनी प्रथमच याबाबत जाहीर व्यक्तव्य केलं. विधानसभा लढवण्यास मी इच्छुक आहे. मात्र माझा मतदारसंघ ठरला नसून वरिष्ठ ठरवतील, तिथून उभं राहणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय.

रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघात चाचपणी करत आहेत. इथे त्यांनी पाण्याचे टँकरही सुरु केले आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत त्यांनी हा मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. तर जामखेडला आमच्याच विचारांचा आमदार निवडून येईल आणि राज्यात आमची सत्ता येईल, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना रोहित पवार यांनी लोकसभेत आघाडीच्या 23 ते 30 जागा निवडून येणार असल्याचा दावा केलाय. लोकसभा निवडणुकीत पार्थला फारसा वेळ मिळाला नाही. आमच्यात चांगला संवाद आहे. गेल्या 20 दिवसात पार्थने बदल केलाय, त्यामुळे पुढील पाच वर्षात काय बदल करेल यावर विश्वास ठेवा, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय.

दुष्काळावरही रोहित पवारांनी भाष्य केलं. राज्यात भीषण दुष्काळ असल्याने नऊ हजार टँकरची गरज आहे. पाच महिने अगोदर दुष्कळ जाहीर केला, मात्र लोकसभेच्या दहा दिवस अगोदर छावणी दिली. पण छावणीसाठी किचकट निकष असल्याचा आरोप केलाय. शेतकऱ्यांना हेक्टरी मदत आणि शैक्षणिक शुल्क आणि  प्रवास भत्ता यावर विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

राज्य सरकारच्या धोरणांवरही रोहित पवारांनी टीका केलीय. जलयुक्त शिवार अभियान नियोजन नाही. या खात्याचे मंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात 100 टँकरची गरज असताना केवळ 30 टँकर दिले जातात. मागणी एवढे टँकर दिले जात नाही, कारण साडे सात हजार कोटी योजना फेल गेली का, असे लोक विचारतील अशी भीती असल्याचं पवार यांनी म्हटलंय.

पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यासाठी योग्य नियोजन केलं नाही. साडे तीन टीएमसी पाणी सोडून दिलं. पाण्यासाठी पुणेकरांना प्रबोधन गरजेचं असल्याचं पुण्याच्या पाण्यावर बोलताना रोहित पवारांनी म्हटलंय.

आजोबा शरद पवार यांच्या ईव्हीएमचा गैरवापर झाल्यास लोकशाहीवरील विश्वास उडेल यावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. विरोधकांना पवारांवर बोलल्यावर प्रसिद्ध मिळते. त्यांच्या विधानाचा मसाला अर्क काढल्याचा दावा त्यांनी केलाय, तर या संदर्भात नेटवर्क जॅमर, टॉवर बंद करता येईल का, यावर विचार करणं गरजेचं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *