AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या पक्षाला मोठा धक्का? राजीनामा पडणार? महिला नेत्याच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ!

तुम्ही असताना आणि तुम्ही नसताना पक्षातील वातावरणात किती मोठा फरक आहे, हे प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याला जाणवत आहे, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली. तसेच आम्ही तुमची माणसं होतो, आहोत आणि कायम राहू, असं रुपाली पाटील ठोंबरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

अजितदादांच्या पक्षाला मोठा धक्का? राजीनामा पडणार? महिला नेत्याच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ!
ncp party and rupali patil thombreImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2026 | 6:47 PM
Share

Rupali Patil Thombare : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. लवकरच शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीएसोबत जाऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे आम्हाला आमच्या वाट्याचे अर्थमंत्रिपद मिळावे, यासाठी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून प्रयत्न चालू आहेत. या सर्व घडामोडींची चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट केली असून लवकरच मला मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे, असं सूचक विधान केलंय. त्यांच्या या फेसबुक पोस्टमुळेच त्या नाराज असून लवकरच त्या पक्षबदल करतील की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

रुपाली पाटील ठोंबरे पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाल्या?

बापमाणूस माननीय अजितदादा मला माफ करा. मी कायम आपल्या ऋणात आहे. तुम्ही असताना अन्याय करणाऱ्यांना, पक्षात चाटेगिरी, फुशारकी नाहक गोंधळ घालणाऱ्यांना, काटाकटी करणाऱ्या नेत्यावर वचक होता. कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणाऱ्यांना लोकांवर शब्दाचा धाक होता. तुम्ही काम करणाऱ्या कार्यकर्ता, पदाधिकाऱ्याचे खमके खंबीर आधार होते. तुमच्याच शब्दाचा मान ठेवून आम्हीही अनेकदा शांत राहिलो, असे रुपाली पाटील ठोंबरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

तसेच पुढे बोलताना, अजितदादांना उद्देशून तुम्ही गेल्यानंतर काहींनी पक्षातील परिस्थिती अधिकच भयावह केली. कार्यकर्त्यांचा, पदाधिकारीचा संयम हा कमकुवतपणा समजण्याची चूक केली जात आहे. आता अन्याय, दडपशाही आणि विश्वासघात यापुढे सहन करणार नाही. म्हणूनच, अजितदादा, मला माफ करा. आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. दुर्गाकाली रूप घ्यावे लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

तुम्ही असताना आणि तुम्ही नसताना पक्षातील वातावरणात किती मोठा फरक आहे, हे प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याला जाणवत आहे, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली. तसेच आम्ही तुमची माणसं होतो, आहोत आणि कायम राहू. तुमची शिकवण, तुमची कामे करण्याची पद्धत आणि न्यायासाठी लढण्याची ताकद आम्ही कधीही सोडणार नाही. राजकारण वंगाळ करणाऱ्यांना, अन्याय करणाऱ्यांना कोणालाही सोडणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला आहे. दरम्यान, आता रुपाली पाटील ठोंबरे नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?