अजित पवारांना लवकरच सर्वात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने…राज्याच्या राजकारणात खळबळ!

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रंगात आलेली असताना आता एक मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वात मोठा धक्क बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अजित पवारांना लवकरच सर्वात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने...राज्याच्या राजकारणात खळबळ!
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 29, 2025 | 3:50 PM

Rupali Thombre Patil : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी लाडकी बहीण आणि इतर काही योजनांचा वारंवार उल्लेख करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीचे घटकपक्ष महायुती सरकारच्या काळातील कथित अनागोंदीचा उल्लेख करून या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच निवडणुकीत अनेक ठिकाणी बड्या नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी आपल्यास सोईच्या पक्षात प्रवेश केला आहे. असे असतानाच आता राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुपाली ठोंबरे पाटील या लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. तसा दावा केला जातोय.

रुपाली ठोंबरे यांनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील नाराज आहेत. त्यामुळेच त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. या दाव्याला बळ देणारी एक अपडेट समोर आली आहे. रुपाली पाटील यांनी नुकेतच शिंदे यांच्या पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे मुंबईत भेट घेतली आहे. विशेष म्हणजे रूपाली पाटील यांच्यासोबत काँग्रेसच्या संगीता तिवारी आणि शिंदे गटाच्या शर्मिष्ठा येवले यादेखील उपस्थित होत्या. त्यामुळे रुपाली ठोंबरे लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रुपाली ठोंबरे नाराज का आहेत?

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका डॉक्टर महिलेने आत्महत्या करून जीवन संपवले होते. या प्रकरणी एक पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले होते. या प्रकरणामुळे सामान्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. याच प्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पोलिसांची बाजू घेतली होती. त्यानंतर चाकणकर यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. रुपाली ठोंबरे पाटील यांनीदेखील चाकणकर यांना लक्ष्य केले होते. हे प्रकरण काहीसे मागे पडल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाने रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केली. या सर्व घडामोडीनंतर रुपाली ठोंबरे पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ाता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.