AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसला ब्रम्हांडनायक? त्या लेखकाने ओशनो जल प्यायलं असेल; रुपाली ठोंबरे पाटील भडकल्या

भोंदू अशोक खरातला 'ब्रम्हांडनायक' म्हणणाऱ्या नामकर्ण आवारे यांच्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी संतप्त टीका केली आहे. "त्या लेखकाने ओशनो जल प्यायलं असेल," असा सवाल करत त्यांनी आवारे यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. खरातच्या भोंदूगिरीवर प्रकाश टाकताना, आवारे यांनी त्याला दिलेली सिद्धपुरुषाची उपाधी हास्यास्पद असल्याचे ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे.

कसला ब्रम्हांडनायक? त्या लेखकाने ओशनो जल प्यायलं असेल; रुपाली ठोंबरे पाटील भडकल्या
रुपाली ठोंबरे पाटील भडकल्या
| Updated on: Mar 31, 2026 | 2:07 PM
Share

भोंदू अशोक खरात हा रुपाली चाकणकर आणि तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत एमआयडीसीत गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यावेळी सिन्नर औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारेही उपस्थित होते. या भेटीचे फोटो आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावर नामकर्ण आवारे यांनी खुलासा केला होता. मी भोंदूबाबा खरातला ओळखत नाही. माझा काही संबंध नाही. मंत्री म्हणून केसरकरांना बोलावलं होतं, असं आवारे यांनी म्हटलं होतं. मात्र, आवारे यांचे खरातशी संबंध असल्याचे पुरावेच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिले होते. आवारे यांनी ‘असा मी नामकर्ण’ नावाचं पुस्तक लिहिलं असून त्या पुस्तकाला खरातने प्रस्तावना लिहिलेली आहे. या पुस्तकातून आवारे यांनी खरातची वरेमाप स्तुती केली आहे. आवारे यांनी खरातला सिद्धपुरुष आणि ब्रह्मांडनायकही म्हटलं आहे. त्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. हा कसला ब्रह्मांडनायक? असा संतप्त सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.

त्या लेखकाने त्याचं ओशनो जल प्यायलेलं असेल. तो व्हिडिओ समोर आला तरी तळपायाची आग मस्तकात जाते. कसला ब्रम्हांडनायक?. ज्याने पुस्तक लिहिलं त्याने निश्चित ते ओशनो जल प्यायलं असेल. त्या पुस्तकावर बंदी आणली पाहिजे, अशी मागणीच रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली.

त्यांची शंका असेल…

रोहित पवार यांच्या ट्विटवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खरातचं कांडचं एवढ मोठं आहे की, मुनगंटीवार म्हणाले तसं त्याला सुया टोचून टोचून मारलं पाहिजे. असला नराधम मेलेला बरं. पण पोलीस त्याला मरूही देणार नाहीत. कारण संवेदनशील असा हा विषय झालेला आहे, असं सांगतानाच रोहित पवार यांनी त्यांची शंका व्यक्त केली असेल, असंही त्या म्हणाल्या.

माहिती तपासूनच…

यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हेंबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. नीलम गोऱ्हेंवर आरोप तृप्ती देसाई यांनी आरोप केला आहे. त्याचे काही फोटो आमच्याकडे नाहीतॉ. याच्यावर नीलमताई गोऱ्हे बोलल्या आहेत. त्या प्रकरणाची माहिती मी पूर्ण घेतलेली नाही. त्यामुळे यावर बोलणं चुकीच राहील. जेव्हा ही माहिती मी तपासून बघेल तेव्हा मी निश्चित यावर बोलेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पण हे भयानक आहे

राष्ट्रवादीच्या संविधानात बदल करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. असं असेल तर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार या सर्व व्यवस्थित करतील. सुनेत्रा पवार यांनी याआधीच जे जे कुणी ठराव, प्रस्ताव आहेत त्याची अंमलबजावणी करू नये असं सांगितलेलं आहे. परंतु हे भयानक आहे. पक्षाची घटना कुणीही बदलू शकत नाही. परंतु असे काही झालं असेल तर सुनेत्रा पवार ते पूर्ववत करतील, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती