नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे सैन्य दलात किंवा पोलीस दलात आपलं नशीब आजमावणारी तरुणाई आस लावून बसली होती. त्यामुळे अखेर पोलीस भरती जाहीर झाल्याने तरुणाईला मोठा आनंद झाला होता. नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष या पोलीस भरतीला सुरुवात झाली होती. आजपासून यामधील शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणचे तरुण गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस भरतीचा सराव करत होते. त्यामुळे अखेर त्यांच्या सरावाची परीक्षा आज होत आहे. नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलाच्या आडगाव येथील मैदानावर ही शारीरिक चाचणी होत आहे. यामध्ये मैदानी चाचणी देखील होत आहे. त्यासाठी पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी भरतीसाठी प्रवेशपत्र मिळालेल्या तरुणाईला विशेष आवाहन केले होते.