AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन अहिर यांचा आधी आदित्य ठाकरेंना फोन, त्यानंतर जय महाराष्ट्र; आज सकाळी काय घडलं?

Sachin ahir political news : सचिन अहिर यांनी शिंदे गटात जाण्यापूर्वी आज मंगळवारी सकाळी आदित्य ठाकरे यांना संपर्क साधून पक्ष सोडणार सांगितले. तसेच त्यांनी भूमिका मांडली होती.

सचिन अहिर यांचा आधी आदित्य ठाकरेंना फोन, त्यानंतर जय महाराष्ट्र; आज सकाळी काय घडलं?
| Updated on: Jun 30, 2026 | 2:47 PM
Share

राज्यात खासदार, आमदार फुटीच्या घटनेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय. त्यानंतर सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या कोट्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. सचिन अहिर यांनी शिंदे गटात जाण्यापूर्वी आज मंगळवारी सकाळी आदित्य ठाकरे यांना संपर्क साधून पक्ष सोडणार असल्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर सचिन अहिर यांनी पक्षाच्या विविध पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक राजकीय भूमिका घेतल्याचे मत सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात खासदार, आमदार फुटी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. आठ दिवसांपूर्वी ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. त्यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेतल्या. या सभेत उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांवर जोरदार टीका केली. मागील तीन दिवसांपासून ठाकरेंचे राज्यभरातील विविध ठिकाणी दौरे होत आहेत. एकीकडे ठाकरेंचा राज्यभरात दौरा सुरू होता. तर दुसरीकडे सचिन अहिर हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते.

विधीमंडळात उपसभापतीपद रिक्त झाल्याने या जागेवर निवडणूक होणार होती. महायुतीत हे पद शिंदे गटाच्या वाट्याला आले होते. त्यानंतर या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. उपसभापतीपदासाठी नीलम गोऱ्हे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे कृपाल तुमाने यांचही नाव चर्चेत होते. परंतु ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्र वापरलं. शिदेंनी उपसभापतीपदासाठी थेट ठाकरेंचा विश्वासू नेता सचिन अहिर यांना उमेदवारी दिली.

सचिन अहिर हे मागील तीन दिवसांपासून शिंदेंच्या संपर्कात होते. त्यानंतर आज शिंदेंनी सचिन अहिर यांना मोठी जबाबदारी सोपवली. त्याआधी सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना फोन केला. अहिर यांनी सकाळी फोन करत आदित्य ठाकरे यांच्याकडे पक्ष सोडणार असल्याची भूमिका मांडली. यानंतर सचिन अहिर यांनी भारतीय कामगार सेना आणि बेस्ट कर्मचारी सेनेच्या पदावरून राजीनामा दिला. यावेळी सचिन अहिर यांनी वैयक्तिक पातळीवर राजकीय भूमिका घेत असल्याचे त्यांना स्पष्ट केले.

Follow Us
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...