‘शेतकरी हंबरडा फोडतोय, मुख्यमंत्री साहेब बळीराजाला चिंतामुक्त कधी करणार ?’ सदाभाऊ खोत यांचा सवाल

| Updated on: Sep 30, 2021 | 5:04 PM

आम्हाला सरकारने मदत करावी अशी मागणी राज्यातील शेतकरी करत आहेत. याच मुद्द्यावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सरकारने शेतकऱ्यांची मदत करवी अशी मागणी केली आहे.

शेतकरी हंबरडा फोडतोय, मुख्यमंत्री साहेब बळीराजाला चिंतामुक्त कधी करणार ? सदाभाऊ खोत यांचा सवाल
SADABHAU KHOT
Follow us on

मुंबई : मराठवाडा, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी होरपळून निघालाय. शेतातील उभे पीक आडवे झाले आहे. खरीप हंगाम हातातून गेल्यामुळे आम्हाला सरकारने मदत करावी अशी मागणी राज्यातील शेतकरी करत आहेत. याच मुद्द्यावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सरकारने शेतकऱ्यांची मदत करवी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातला शेतकरी आज शेतामध्ये हंबरडा फोडत आहे. त्याच संपूर्ण शेत आता जलमय झालं आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बळीराजाला चिंतामुक्त कधी करणार ? असा सवाल खोत यांनी केलाय.

राज्यसरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे

“शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशी एका मागोमाग संकट येत आहेत. राज्य सरकार मात्र आम्ही तुम्हाला मदत करू, यापलिकडे काहीच बोलायला तयार नाही. महापुरातल्या आणि चक्रीवादळातील शेतकऱ्यांना राज्य सरकार कोणत्याही प्रकारची मदत होऊ शकले नाही. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण राज्यसरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे,” असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली.

शेतकरी सरणावर गे,ला चिंतामुक्त करायला तयार नाही

“देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये आम्हाला केंद्र सरकारकडून काय मदत मिळणार आहे, याची कधी वाट पाहिली नाही. तर फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटनामध्ये पॅकेज जाहीर करून मदत केली. सर्वात मोठी कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत तुम्हाला आम्ही चिंतामुक्त करतो. पण शेतकरी सरणावर गेला तरी तुम्ही त्याला चिंतामुक्त करायला तयार नाही,” अशा शब्दात खोत यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

जिरायती शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत करावी

“महापूरातील व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने 20 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे. सरसकट पंचनामे करा, सरसकट विम्याचे पैसे द्या. सरसकट सर्व शेतकऱ्यांचे पीककर्ज तातडीने माफ करा. बागायाती शेतकऱ्यांना व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आणि जिरायती शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत करावी,” अशी मागणी खोत यांनी सरकारकडे केली. तसेच बोलघेवडा पणा आता बंद करा आणि राज्याची तिजोरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या साठी उघडी करा आणि तात्काळ शेतकऱ्यांना खऱ्या अर्थांनी चिंतामुक्त करा, सल्लादेखील त्यांनी सरकारला दिला.

इतर बातम्या :

भाजीपाला विकणारे भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे?, पालकमंत्रीपद काढून घ्या; कांदेंचा घणाघात

Maharashtra College Reopen: शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरला तर कॉलेज दिवाळीनंतर सुरु, उदय सामंतांची माहिती

सांगलीतील मिरज जातीय दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता

(sadabhau khot slams maha vikas aghadi government over heavy rain and farmer help demand quick help)