AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीतील मिरज जातीय दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता

सांगलीतील मिरज जातीय दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता

सांगलीतील मिरज जातीय दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 4:37 PM
Share

सांगली : मिरज येथे 2009 साली घडलेल्या जातीय दंगलीप्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आघाडी सरकारने या दंगलीप्रकरणातील खटले काढून टाकण्याबाबत न्यायालयालात अर्ज केला होता.

2009 मध्ये गणेशोत्सवादरम्यान घडली होती जतीय दंगल 

जिल्हा सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. 2009 मध्ये गणेश उत्सवादरम्यान ही जातीय दंगल घडली होती.

दंगल भडकल्यामुळे पोलिसांनी केली होती कारवाई ?

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे 2009 साली गणोशोत्सवादरम्यान जातीय दंगली उसळल्या होत्या. अफझलखानाच्या वधाचे पोस्टर फाडल्यावरुन ही दंगल उसळली होती. या दंगलीनंतर पोलिसांनी विविध पक्षांचे कार्यकर्ते तसेच नागरिक यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी दगडफेक, जळपोळ करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच चिथावणीखोर भाषण देणे या गुन्ह्यांखाली कारवाई केली होती. या प्रकरणाची सुनावणी सांगली येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. आजच्या निकालात न्यायालयाने एकूण 106 जणांची निर्दोष मुक्तता केली.

नेमकं प्रकरण काय आहे ?

मिरज शहरा मध्ये 2009 साली गणेशोत्सवादरम्यान शिवसेनेकडून मिरज शहरामध्ये अफजलखान वधाचा फलक उभारण्यात आला होता. त्यावर लिहिण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मिरज शहरामध्ये जातीय दंगल भडकली होती. दहा ते पंधरा दिवस मिरज शहर या दंगलीत धगधगत होतं. या दंगलीचे पडसाद सांगली जिल्ह्यासह शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले होते. पंधरा दिवस मिरज-सांगली शहरांमध्ये कडक संचारबंदी लागू होती. या दंगली प्रकरणी सांगली महापालिकेचे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मिरज शिवसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या 106 जणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या दंगलीचा खटला सुरू होता.

खटला बरखास्त करण्यासाठी महाविकास आघाडीकडून अर्ज

दरम्यान दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारकडून हा खटला बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयाने खटला बरखास्त करून या दंगलीप्रकरणी 106 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. तशी माहिती बचाव पक्षाच्या वकील बिलकीस बुजरूक यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

शिवसेना आमदार कांदेंचा पुन्हा प्रहार; भुजबळ भाई युनिव्हर्सिटीचे प्राचार्य, पुरावे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिले!

महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुगली, नांदेडचे सुपुत्र विवेक चौधरी देशाच्या वायूदल प्रमुखपदी

Maharashtra College Reopen: शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरला तर कॉलेज दिवाळीनंतर सुरु, उदय सामंतांची माहिती

(sangli miraj 2009 communal riot case all 106 accused acquitted by district court)

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.