महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुगली, नांदेडचे सुपुत्र विवेक चौधरी देशाच्या वायूदल प्रमुखपदी

राजीव गिरी

| Edited By: |

Updated on: Sep 30, 2021 | 3:50 PM

संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि विशेषत: नांदेडसाठी आनंदाची बातमी आहे. कारण नांदेडचे सुपुत्र विवेक राम चौधरी यांनी आज भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलाय. त्यांच्या निवडीने नांदेडसह महाराष्ट्रात आनंद व्यक्त करण्यात येतोय.

महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुगली, नांदेडचे सुपुत्र विवेक चौधरी देशाच्या वायूदल प्रमुखपदी
एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनले आहेत.

नांदेड : संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि विशेषत: नांदेडसाठी आनंदाची बातमी आहे. कारण नांदेडचे सुपुत्र विवेक राम चौधरी यांनी आज भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलाय. त्यांच्या निवडीने नांदेडसह महाराष्ट्रात आनंद व्यक्त करण्यात येतोय. एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया आज सेवा निवृत्त झाले. भदोरिया 42 वर्षांच्या सेवेनंतर आज निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडून विवेक चौधरी यांनी पदाची सूत्र स्वीकारली आहेत.

विवेक चौधरी यांचे आजोबा हे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हस्तरा या गावात काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे हस्तरा या गावातील नागरिकांनी चौधरींच्या यांच्या या नियुक्तीबद्दल आंनद व्यक्त केलाय. चौधरी यांच्या या मराठमोळ्या कनेक्शनमुळे संबंध नांदेड जिल्ह्यातून देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.सोशल मीडियावर तर अक्षरशः त्यांच्या अभिनंदनाच्या पोस्टचा पाऊस सुरू आहे.

विवेक चौधरी यांची थोडक्यात ओळख

हवाई दलाचे उपप्रमुख बनण्यापूर्वी एअर मार्शल चौधरी यांनी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांड (डब्ल्यूएसी) चे कमांडर-इन-चीफ म्हणून काम केले आहे. या कमांडवर संवेदनशील लडाख प्रदेश तसेच उत्तर भारताच्या इतर भागांमध्ये देशाच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे.

एअर मार्शल चौधरी यांचा 29 डिसेंबर 1982 रोजी हवाई दलाच्या लढाऊ विभागात समावेश करण्यात आला. 3 वर्षांच्या विशिष्ट कारकीर्दीत या अधिकाऱ्याने भारतीय हवाई दलाची विविध लढाऊ आणि प्रशिक्षक विमाने उडवली आहेत. त्यांच्याकडे मिग – 21, मिग – 23 एमएफ, मिग – 29 आणि सुखोई – 30 एमकेआय लढाऊ विमानांच्या ऑपरेशनल फ्लाइंगसह 3,800 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.

अनेक महत्त्वाच्या पदांवर काम

चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. हवाईदल उपप्रमुख बनण्यापूर्वी ते वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते.

एअर मार्शल चौधरी यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते फ्रंटलाइन फाइटर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर होते, तसेच फ्रंटलाइन फाइटर बेसचे कमांडिंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी कामकाज सांभाळले आहे. ते एक उत्तम उड्डाण प्रशिक्षक, आणि इन्स्ट्रुमेंट रेटिंग प्रशिक्षक आणि परीक्षक आहेत.

यासोबतच, चौधरी यांनी सहाय्यक वायुसेना प्रमुख (कार्मिक अधिकारी) आणि नंतर नवी दिल्ली येथील हवाईदल भवन स्थित हवाई दल मुख्यालयात हवाईदल उपप्रमुख म्हणून काम केले आहे. यासह, त्यांनी ऑक्टोबर 2019 ते जुलै 2020 पर्यंत ईस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे.

हे ही वाचा :

New Air Chief Marshal : एअर मार्शल व्ही.आर. चौधरी यांची पुढील हवाईदल प्रमुखपदी वर्णी

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI