New Air Chief Marshal : एअर मार्शल व्ही.आर. चौधरी यांची पुढील हवाईदल प्रमुखपदी वर्णी

केंद्र सरकारने एअर मार्शल व्ही. आर. चौधरी (Air Marshal VR Chaudhuri) यांना देशाचे पुढील हवाई दल प्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

New Air Chief Marshal : एअर मार्शल व्ही.आर. चौधरी यांची पुढील हवाईदल प्रमुखपदी वर्णी
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 8:52 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एअर मार्शल व्ही. आर. चौधरी (Air Marshal VR Chaudhuri) यांना देशाचे पुढील हवाई दल प्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे. चौधरी सध्या हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. विद्यमान हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर चौधरी हे पद स्वीकारतील. एअर मार्शल विवेक राम चौधरी यांनी या वर्षी 1 जुलै रोजी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. (Air Marshal VR Chaudhari will be new chief of Indian Air Force)

हवाई दलाचे उपप्रमुख बनण्यापूर्वी एअर मार्शल चौधरी यांनी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांड (डब्ल्यूएसी) चे कमांडर-इन-चीफ म्हणून काम केले आहे. या कमांडवर संवेदनशील लडाख प्रदेश तसेच उत्तर भारताच्या इतर भागांमध्ये देशाच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे.

एअर मार्शल चौधरी यांचा 29 डिसेंबर 1982 रोजी हवाई दलाच्या लढाऊ विभागात समावेश करण्यात आला. 3 वर्षांच्या विशिष्ट कारकीर्दीत या अधिकाऱ्याने भारतीय हवाई दलाची विविध लढाऊ आणि प्रशिक्षक विमाने उडवली आहेत. त्यांच्याकडे मिग – 21, मिग – 23 एमएफ, मिग – 29 आणि सुखोई – 30 एमकेआय लढाऊ विमानांच्या ऑपरेशनल फ्लाइंगसह 3,800 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.

अनेक महत्त्वाच्या पदांवर काम

चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. हवाईदल उपप्रमुख बनण्यापूर्वी ते वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते.

एअर मार्शल चौधरी यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते फ्रंटलाइन फाइटर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर होते, तसेच फ्रंटलाइन फाइटर बेसचे कमांडिंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी कामकाज सांभाळले आहे. ते एक उत्तम उड्डाण प्रशिक्षक, आणि इन्स्ट्रुमेंट रेटिंग प्रशिक्षक आणि परीक्षक आहेत.

यासोबतच, चौधरी यांनी सहाय्यक वायुसेना प्रमुख (कार्मिक अधिकारी) आणि नंतर नवी दिल्ली येथील हवाईदल भवन स्थित हवाई दल मुख्यालयात हवाईदल उपप्रमुख म्हणून काम केले आहे. यासह, त्यांनी ऑक्टोबर 2019 ते जुलै 2020 पर्यंत ईस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे.

इतर बातम्या

Udhampur Helicopter Crash: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा अपघात, 2 पायलट मृत्यूमुखी

संरक्षण दलात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव लवकरच लागू होणार, अधिकाऱ्यांची कमतरता होईल दूर

(Air Marshal VR Chaudhari will be new chief of Indian Air Force)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.