AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना आमदार कांदेंचा पुन्हा प्रहार; भुजबळ भाई युनिव्हर्सिटीचे प्राचार्य, पुरावे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिले!

शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी गुरुवारी (30 सप्टेंबर) पुन्हा एकदा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. भुजबळांविरोधातले पुरावे आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले आहेत. भुजबळांनी तब्बल 10 कोटी रुपये कंत्राटदारांना वाटत भ्रष्टाचार केल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

शिवसेना आमदार कांदेंचा पुन्हा प्रहार; भुजबळ भाई युनिव्हर्सिटीचे प्राचार्य, पुरावे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिले!
छगन भुजबळ आणि सुहास कांदे
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 4:05 PM
Share

नाशिकः शिवसेना आमदार सुहास कांदे (ShivSena MLA) यांनी गुरुवारी (30 सप्टेंबर) पुन्हा एकदा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. भुजबळांविरोधातले पुरावे आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले आहेत. भुजबळांनी तब्बल 10 कोटी रुपये कंत्राटदारांना वाटत भ्रष्टाचार केल्याचा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला.

आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणि वाद विकोपाला गेला आहे. कांदे यांनी आपल्याला भुजबळांविरोधातली याचिका मागे घेण्याची अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी आल्याचा आरोप केला होता. मात्र, आता या प्रकरणाला बुधवारी नाट्यमय कलाटणी मिळाली. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) युवा विंगचे प्रदेश अध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी हे सारे आरोप फेटाळून लावत, खोट्या आरोपांबद्दल आमदार कांदे यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला. आता त्यानंतर आज गुरुवारी कांदे यांनी पत्रकार परिषद घेत थेट भुजबळांना जोरदार टीकास्त्र सोडले. विशेष म्हणजे त्यांच्या सोबतीला शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकरही होते. यावेळी आमदार कांदे म्हणाले, गुन्हेगार कधी गुन्हा केला हे सांगत नाही. अक्षय निकाळजे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचा पोलीस आयुक्त तपास करतील. मुंबईच्या टेकचंदानी या व्यापाराला भुजबळांच्या बाजूने श्रीलंकेवरून धमकीचा फोन आला होता. भुजबळांची ही अशी पार्श्वभूमी आहे. भुजबळ आणि माझा वाद हे महाविकास आघाडीचे भांडण नाही. 12 कोटी निधी आला. यातील 10 कोटी रुपये भुजबळांनी कंत्राटदारांना वाटले. माझ्या मतदारसंघात फक्त 2 कोटी दिले. भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही. मग अधिकार नसताना छगन भुजबळ यांनी निधी वाटप करून गैरव्यवहार का करावा, असा सवाल त्यांनी केला. छगन भुजबळ भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नव्हे, तर प्राचार्य आहेत. भाजीपाला विकणारे भुजबळ 25 वर्षांत 25 हजार कोटींचे मालक कसे झाले, असा सवाल करत कांदे यांनी वर्मावर बोट ठेवले.

भुजबळांना दिले खुल्या चर्चेचे आव्हान

शिवसेना जिल्हाप्रमुख करंजकरांनी यावेळी भुजबळांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. करंजकर म्हणाले, भुजबळांनी नियोजन निधी कॉन्ट्रॅक्टरच्या घश्यात घालायचे काम केले आहे. पालकमंत्री अन्याय करत आहेत. शिवसेना स्वबळावर लढणारी संघटना आहे. महापालिका निवडणूक तोंडावर असताना आम्हाला गुंड्या-तोड्या करण्याची गरज नाही. भुजबळांनी भ्रष्टाचार केला असून, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी त्यांच्यासमोर केव्हाही चर्चेला तयार असल्याचे आव्हान त्यांनी दिले. (Evidence against Minister Chhagan Bhujbal given to CM, Deputy CM, claims Shiv Sena MLA Suhas Kande)

इतर बातम्याः

अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणाला नाट्यमय कलाटणी, निकाळजे म्हणतात, कांदेंवर दावा ठोकणार

Special Report: अहो, नाशिकच काय? गल्लीपासून दिल्लीपर्यंत…नावात बरंच काही आहे!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.