AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हुशार लोक या 6 ठिकाणी कधीच जात नाहीत, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलंय?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये हुशार माणसांची काही लक्षणं सांगितली आहेत. चाणक्य म्हणतात जे लोक शहाणे असतात ते या 6 ठिकांणापासून लांबच राहतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : हुशार लोक या 6 ठिकाणी कधीच जात नाहीत, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलंय?
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 01, 2026 | 8:37 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही माणसाला उपयोगी ठरतात. माणसानं कोणाशी मैत्री करावी? आणि कोणापासून लांब राहावं, माणसानं कसं जीवन जगावं आणि कसं जिवन जगू नये? माणसानं कुठे जावं आणि कुठे जाऊ नये? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अशा 6 जागा असतात जिथे माणसाने कधीही जाऊ नये, जर अशा ठिकाणी गेलात तर भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे शहाणी माणसं नेहमी अशा जागांपासूनच दूरच राहतात. ते कधीही या ठिकाणी जात नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यानी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

रोजगाराच्या संधी – चाणक्य म्हणतात ज्या प्रदेशामध्ये कामाच्या संधी उपलब्ध नाहीत, किंवा तुम्हाला तुमच्या कामाच्या बदल्यात अपेक्षित मोबदला मिळत नाही, अशा ठिकाणी हुशार लोक कधीही जाण्याची चूक करत नाहीत. कारण त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असते की अशा ठिकाणी भविष्यात आपलं फार मोठं नुकसान होऊ शकतं.

भीतीचं वातावरण – चाणक्य म्हणतात ज्या प्रदेशात सतत भीतीचं वातावरण आहे, तेथील राजा हा अविवेकी आहे, अशा प्रदेशात जाण्याची चूक शहाणे माणसं कधीच करणार नाहीत. कारण ज्या प्रदेशात नेहमी भीतीचं वातावरण असतं, अशा राज्याचा विकास कधीही होऊ शकत नाही

कायद्याचा धाक – चाणक्य म्हणतात जिथे कायद्याचा धाक नाही, अराजक आहे. अशा ठिकाणी जाण्याची चूक शहाणे लोक कधीही करत नाहीत. कारण जिथे कायद्याचा धाक नाही अशा ठिकाणी तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, तुमच्यासोबत अन्याय होऊ शकतो. असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मर्यादा – चाणक्य म्हणतात कोणत्याही गोष्टी एक विशिष्ट मर्यादा असते, मात्र तुम्ही जर मर्यादा सोडली तर विनाश अटळ असतो. त्यामुळे जिथे मर्यादा नाही, तिथे शहाणे लोक कधीही जात नाहीत.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, ते आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी कधीही जाऊ नये, त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं.

दानधर्म – चाणक्य म्हणतात जिथे दानधर्माची भावना नाही, एकमेकांना मदत करण्याची भावना नाही, अशा ठिकाणी शहाणे लोक कधीही जात नाहीत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या