उदगीर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदीही मंत्री महोदय; प्रकाशक, ग्रंथवितरकांकडून मागवले अर्ज, कुठे साधाल संपर्क?

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी एक लेख लिहून नाशिक येथील साहित्य संमेलनाच्या निमंत्रकापासून ते आयोजकांपर्यंत साऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. नाशिकचे साहित्य संमेलन एकट्या छगन भुजबळांचे झाले. नाशिकने संमेलनासाठी निधी उभारण्याचा नवा फॉर्म्युलाच शोधला. एखाद्या मंत्र्याला किंवा वजनदार नेत्याला स्वागताध्यक्षपद बहाल केले की, साहित्य संमेलन कम राजकीय संमेलन झोकात साजरे झालेच म्हणून समजा, अशी टीकेची झोड उडवली होती. त्यानंतरही उदगीरच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्यमंत्र्यांची निवड करण्यात आली आहे.

उदगीर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदीही मंत्री महोदय; प्रकाशक, ग्रंथवितरकांकडून मागवले अर्ज, कुठे साधाल संपर्क?
उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 9:01 AM

नाशिकः नाशिक (Nashik) येथे मोठ्या दणक्यात झालेल्या साहित्य संमेलनानंतर आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे होत आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात 22, 23 आणि 24 एप्रिल 2022 रोजी हे संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची निवड झाली आहे, तर स्वागताध्यक्ष म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी एक लेख लिहून नाशिक येथील साहित्य संमेलनाच्या निमंत्रकापासून ते आयोजकांपर्यंत साऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. नाशिकचे साहित्य संमेलन एकट्या छगन भुजबळांचे (Chhagan Bhujbal) झाले. साहित्य संमेलन पंचतारांकित करण्याच्या नादात महामंडळाच्या धोरणाचा बळी दिला. नाशिकने संमेलनासाठी निधी उभारण्याचा नवा फॉर्म्युलाच शोधला. एखाद्या मंत्र्याला किंवा वजनदार नेत्याला स्वागताध्यक्षपद बहाल केले की, साहित्य संमेलन कम राजकीय संमेलन झोकात साजरे झालेच म्हणून समजा. भागातील दहा-वीस आमदार आणि एक दोन खासदारांची पत्रे घ्यायची. त्यांच्या निधीतून दीड-दोन कोटी विनासायास मिळतात, अशी टीकेची झोड ठाले-पाटील यांनी महामंडळाच्या अक्षरयात्रा या नियतकालिकातील अध्यक्षीय मनोगतातून उडवली होती. त्यानंतरही उदगीरच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्यमंत्र्यांची निवड करण्यात आली आहे.

ग्रंथवितरकांनी कुठे साधावा संपर्क

उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनातील ग्रंथदालनासाठी प्रकाशक, ग्रंथवितरकाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना, अटी व शर्ती http:abmss९५.mumu.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्ज 31 मार्च 2022 पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत दाखल करावेत. अधिक माहितीसाठी पुस्तक प्रदर्शन समितीचे समन्वयक ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांच्याशी 9090687127, 98904222800 या क्रमांवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

वैद्यकीय मदत समितीची बैठक

साहित्य संमलेनासाठी वैद्यकीय मदत समितीची बैठक कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, सदस्य डॉ. रामप्रसाद लखोटिया, डॉ. रेखा रेड्डी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांची उपस्थिती होती. संमेलनात रुग्णवाहिका, औषधे, डॉक्टर, तंत्रज्ञ, परिचारिका उपलब्ध करावेत. वैद्यकीय मदतीसाठी शासकीय रुग्णालयाची मदत घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वैद्यकीय मदत कक्षाबद्दल सविस्तर चर्चा होऊन जबाबदारीचे वाटप करण्यात आले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून अक्षरशः लूट; शुक्ल म्हणतात, माझ्या पुस्तकांचा तुरुंग फोडा…!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.