AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या हत्येचा कट रचला होता, काळं फासल्यानंतर प्रवीण गायकवाडांचा खळबळजनक आरोप!

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलं. त्यानंतर त्यांनी माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा आरोप केला आहे.

माझ्या हत्येचा कट रचला होता, काळं फासल्यानंतर प्रवीण गायकवाडांचा खळबळजनक आरोप!
pravin gaikwad and sambhaji brigade
| Updated on: Jul 13, 2025 | 9:01 PM
Share

Attack on Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आल्याची घटना घडली. ते अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांना शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आणि त्यांना काळं फासत मारहाण केली. दरम्यान, या घटनेनंतर आता माझी हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय.

माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता

काळं फासण्याच्या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी सोलापूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुरोगामी चळवळीचे काम थांबणार नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार संपणार नाहीत, असे ठणकावून सांगितले. तसेच माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असाही खळबळजनक आरोप त्यांनी केला. माझ्यासोबत जो प्रकार घडला त्याला सरकार जबाबदार आहे. माझ्या हत्येचा कट रचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आम्ही शिवराय , फुले आणि आंबेडकरांची विचारधारा मांडत आहोत. माझ्यावर हल्ला करणारे भाजपाचे कार्यकर्ते होते, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

मी समाजासाठी 30 वर्षांपासून…

ज्यांनी माझ्यावर हल्ला केला, त्यांना आज किंवा उद्या पश्चात्तापच होईल. मी मराठा समाजातून येतो. गेल्या 30 वर्षांपासून मी काम करत आहे. मी समाजासाठी 30 वर्षांपासून काम रतोय. शाहू, फुलेंचा विचार संपणारा नाही. हा विचार दाबला जाऊ शकत नाही. मानवता, बंधूता अखंड राहिली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सरकारने हल्ल्याच कट उघडा पाडायला हवा

माझी आणि ज्ञानेश महाराव यांच्याशी चर्चा झालेली आहे. संरक्षणाची मागणी करायला माझे कार्यकर्ते सक्षम आहेत. आम्ही संभाजीराजे भोसले पूर्ण समाजाला दाखवले. सरकारने माझ्यावर हल्ला केल्याचा कट उघडा करायला हवा. मला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. याआधी डॉक्टर दाभोळकरांचा खून झालेला आहे. पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत, असं म्हणत सरकारने यात लक्ष घालायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.

संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. आमचं काम चालूच राहणार आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितले.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.