AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं
pravin gaikwad
| Updated on: Jul 13, 2025 | 3:58 PM
Share

Pravin Gaikwad : अक्कलकोटमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ही घटना घडली. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं असल्याचं बोललं जातंय.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर होते. यावेळी ते फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आले होते. तिथे येताच काही लोक अचानकपणे त्यांच्याकडे आले आणि जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं. काळं फासणारे लोक हे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवधर्म फाऊंडेशनचा होता राग

प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचादेखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणदेखील केले होते.

कशा पद्धतीने फासलं काळं?

प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत. एकूण दोन संभाजी ब्रिगेड आहेत. गायकवाड हे दुसऱ्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्रभर दौरे करत असतात. ते आज अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमस्थळी दाखल होत असतानाच शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते तेथे जमा झाले आणि गायकवाड यांना काळे फासण्यात आले.

प्रवीण गायकवाड यांना मारहाण?

शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्यानंतर प्रवीण गायकवाड हे कारमध्ये जाऊन बसले. पण शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी कारमध्ये घुसून गायकवाड यांना मारहाण केली. त्यानंतर रस्त्यावरही त्यांना मारहाण झाल्याचे समोर आले.

सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, पण..

दरम्यान आज अक्कलकोट मध्ये प्रवीण गायकवाड यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना काळं फासण्यात आलं. हे प्रकरण घडल्यानंतर अद्याप प्रवीण गायकवाड यांनी कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणावर गायकवाड नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.