Devendra Fadnavis: आगामी निवडणुकीत भाजपच एक नंबरचा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा दावा, महायुती एकत्र लढणार? मित्रपक्षांविषयी धोरण काय?

Devendra Fadnavis on Mahayuti: स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपच एक नंबरचा पक्ष असेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर आता महायुती म्हणून एकत्र लढणार का आणि मित्रपक्षांविषयी भाजपचे काय धोरण आहे यावर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भाष्य केले.

Devendra Fadnavis: आगामी निवडणुकीत भाजपच एक नंबरचा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा दावा, महायुती एकत्र लढणार? मित्रपक्षांविषयी धोरण काय?
देवेंद्र फडणवीस
Updated on: Nov 16, 2025 | 2:04 PM

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच एक नंबरचा पक्ष ठरेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केला. भाजपच्या नुतन कार्यालयाचे उद्धघाटन त्यांचे हस्ते झाले. तर वसंतराव नाईक आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना नुतन वास्तूत संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी महायुती म्हणून एकत्र लढणार का आणि मित्रपक्षांविषयी भाजपचे काय धोरण आहे यावर भाष्य केले.

आगामी निवडणुकांमध्ये भाजपचे धोरण काय?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका आहेत. या ठिकाणी मोठा विजय मिळवायचा आहे. जिथे जिथे शक्य आहे. तिथे तिथे आपल्याला महायुती करायची आहे. जिथे शक्य नाही, तिथं आपण करू शकणार नाही. पण एक लक्षात ठेवायचं आहे की, आपली जिथं महायुती झाली नाही. तरी आपल्यासमोर लढणारे पक्ष हे आपले मित्रक्ष आहेत. ते आपले शत्रू नाहीत. ते आपले विरोधक नाहीत. हे लक्षात ठेऊनच आपल्याला आपली लढाई करायची असल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमातून दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जो कुणी विजयी होईल तो महायुतीचाच असला पाहिजे असे प्रयत्न करू. पण तुमच्या आशीर्वादाने आणि मेहनतीने भाजपच राज्यात एक नंबरचा पक्ष असेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसली

सर्वांना बिहारमध्ये निवडणुका झाल्या.बिहारच्या जनतेचे मी आभार मानतो, भाजपचे आपण सर्व कार्यकर्ते अतिशय आनंदी आहोत.आपल्या सगळ्यांच्या वतीने पंतप्रधानांचे मी अभिनंदन करतो.आपल्या विजयाचा रथ सातत्याने पुढे चालला आहे.मोदींवर देशात सर्वांचा विश्वास आहे
फेकनेरेटिव्हला जनताच उत्तर देत आहे.जो पर्यंत काँग्रेससहीत विरोधीपक्ष जमीनीवरील हकिकत समजून घेत नाही.जनतेचे प्रश्न मांडत नाही तोपर्यंत त्यांची अशीच होईल. ते स्व:ताचं समाधान करु शकतात, ईव्हीएम मुद्दा. वोटचोरी मुद्दा सातत्याने मांडतात. कोर्ट म्हणतं पुरावा द्या तेव्हा कवडीचा पुरावा देत नाही. हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसली आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. त्यांची हीच अवस्था महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत होईल असे भाकीत फडणवीसांनी केले.

मी अतुल सावे यांचं विशेष अभिनंदन करतो.आपले नेते प्रमोदजी, गोपिनाथजी आपल्याला स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. संभाजीनगर वासियांचं त्यांच्यावर प्रेम होतं. या सर्व लोकांनी सातत्याने आपली कार्यालयं झाली पाहिजे. पक्षाला स्थैर्य आलं पाहिजे यासाठी खूप प्रयत्न केले
जसे मिळतील तसे कार्यालय आपण त्या काळात उभे केले. कुठे उभे राहू शकले नाहीतर किरायाच्या जागेवर कार्यालय चालवले. 100 टक्के परवानग्या घेऊनच भाजपचे कार्यालय झाले पाहिजे. संभाजीनगर विभागाचे हे कार्यालय असणार आहे. आपल्या बैठका इथे होतात, मराठवाड्याच्या. या ठिकाणी आपलं कार्यालय प्रशस्त असं हवं. काही जमीनी घेतल्या विकल्या, काही इमारती घेतल्या.

मधल्या काळात अतुलजी मला जागा दाखवायला घेऊन आले. विमानतळाजवळ जागा आहे, प्रशस्त जागा आहे, ही घेतली पाहिजे. तेव्हा सगळ्यांना ही जागा आवडली आणि आपण ही जागा घेतली.कार्यालय बनवत असताना कार्यालय मी पाहिलं सूचना दिल्या.त्या सुद्धा सूचना अंमलात आणल्या. २ मोठे हॉल आहेत. छत्रपती संभाजीनगलला प्रदेश कार्यकारिणी करायची असेल तर ती इथे होऊ शकते. सर्व प्रकारच्या बैठकी होऊ शकतात. कार्यालय ही व्यवस्था आहे, कार्यालयाच्या उपयोग करुन अधिक लोकाभिमुक्ता काय आणणार आहोत. कार्यकर्त्यांना काय आधार देणार आहोत याच्यावर पक्षाचा विस्तार असतो. पायाभूत सुविधा पक्षाने तयार केली आहे. कार्यालयाचा विस्तार करुन प्रश्न सोडवायचे आहेत, असे फडणवीस म्हणाले.

ठाकरे-पवार यांच्यावर टीका

संभाजीनगरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता 16 कोटी रुपयांची योजना सुरु केली आणि त्याचे काम आम्ही सुरु केलं. शरद पवार गट, उबाठा काँग्रेस कशा प्रकराचे लोकं आहेत. यांना लाज वाटत नाही, 800 कोटीचा भार महापालिकेवर येत होता. आपण एका मिनिटात जीआर काढला. या लोकांचं सरकार आल्यावर पहिला निर्णय यांनी घेतला. त्यांनी 800 कोटी पालिकेनं भरावे असा निर्णय घेतला. दोन वर्ष ही योजना थकित योजना झाली होती. आपलं सरकार आल्यानंतर 800 कोटी आपण दिले.

पहिला टप्पा आपण या ठिकाणी केला. ही भाजप आणि महायुतची देण संभाजीनगरला आहे. हे आंदोलन करतायत यांच्यासारखे खोटारडे लोकं नाहीत. महापालिका निवडणुकीत यांना जागा दाखवायची आहे. वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक या ठिकाणी येत आहे. हजारो कोटींची गुंतवणूक आली, हजारो हातांना काम देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. देशातील ईव्हीचं कॅपीटल संभाजीनगर होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळी कामं केली. विमानतळावर देखील मोठ्या प्रमाणात काम करत आहोत असे फडणवीस यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिलासा

मराठवाड्यातील सिंचनाचे प्रश्न, मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचं काम सरकारच्या माध्यमातून झालं. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहिली. शेतकऱ्यांच्या खात्यात 100 टक्के पैसे पोहोचले आहे. येत्या दोन तीन दिवसात उर्वरीत रक्कम पोहचणार असल्याचे ते म्हणाले. कधी नव्हे ते उद्धवजी मराठवाड्यात आले. आधी माणसंच नसायची. आमचे अंबादास दानवे म्हणायचे माणसं कुठे गेले, माणसं कुठे गेले आणि माणसं आणायचे असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी दानवे यांना काढला.