AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Praful Patel: ‘कोणी स्वतःला बाहुबली समजू नये,अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय’, प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणावर?

Praful Patel NCP: बिहार निवडणूक निकालाने भाजपमध्ये शंभर हत्तीचे बळ आले आहे. तर आता मित्रपक्षांची चिंता वाढली आहे. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केले आहे.

Praful Patel: 'कोणी स्वतःला बाहुबली समजू नये,अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय', प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणावर?
प्रफुल्ल पटेल, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप
| Updated on: Nov 16, 2025 | 12:57 PM
Share

Local Body Election: घरी बसून कोणी वोट करणार नाही. यासाठी वातावरण तयार करा. कोणी स्वतःला बाहुबली समजत असेल तर, आम्ही अशा अनेक बाहुबलींना निवडून आणलेलं आहे. निवडणुकीसाठी पैसे लगातत. आपण महायुतीत असलो तरी, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पैशांच्या पुढे कुणी म्हणत असेल की मी निवडून आलोच तर असं होत नाही. आपण सक्षम आहोत, इतरांना आपली चिंता करावी लागेल. समझनेवालो को इशारा काफी है, असे वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (NCP Praful Patel) यांनी केले आहे. भंडाऱ्यात पक्षाच्या कार्यक्रमात त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता, याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे. बिहार निवडणुकीमुळे भाजपमध्ये नवचैतन्य संचारले आहे. भाजप प्रत्येक राज्यात वरचढ ठरत असल्याने शतप्रतिशत भाजपचा नारा आता स्थानिक निवडणुकीतही खरा ठरणार का? याची चर्चा रंगली आहे.

निवडणूक लढवण्याचा निर्णय स्थानिकांचा

बिहार निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 16 उमेदवार उभे केले होते. मात्र, त्या सर्वांचे डिपॉझिट जप्त झालं. अजित पवारांनी यावर बोलताना, बिहार निवडणुकीसाठी उमेदवार देऊ नका असं सांगितल्याचं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोललेत. तर, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी बिहारच्या स्थानिक लोकांनी ठरवलं, पक्षाचा कुठंही आग्रह नव्हता.आम्ही कुठंही प्रचाराला गेलो नाही. आमचा कुठेही आग्रह नव्हता की, आमचा उमेदवार उभा करा. पण, स्थानिक स्तरावर काहीना काही पक्षाचे जे संघटन असतात त्यात लोकांची इच्छा राहतेचं, लोकल लेव्हलवर त्यांनीच निर्णय घेतला. पण, आमच्या पक्षश्रेष्ठीकडून काही विशेष तिथे काही लक्ष घातलं नाही, अशी सावरासावर केली.

पश्चिम बंगालमध्येही भाजपचं सरकार

बिहार निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील टार्गेट पश्चिम बंगालला केलं आहे. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मधून गेलेली गंगा पश्चिम बंगालमध्ये मिळते असं म्हणत पटेल यांनी ममता बॅनर्जी यांना एक प्रकारे इशारा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची नीती आणि त्यांची दिलेली योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत आहे. तसा एक परिणाम आणि त्याचीही पावती आहे. पश्चिम बंगालमध्ये ही फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीमध्ये ही भारतीय जनता पार्टीचं तिथे नक्कीच चांगलं प्रदर्शन राहील. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही नक्कीच वाढ होईल किंबहुना सरकारही बनू शकेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा ते गंगासागर असा दिलेला नारा योग्य असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल यांनी सांगितलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक महायुती स्वबळावर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने स्वबळावर लढण्याचा विचार केला आहे. काही काही ठिकाणीच जमल्यास महायुतीमध्ये अलायन्स होऊ शकते. पण, महायूतीच्या तिन्ही पक्षाने आम्ही निर्णय केलेला आहे, सगळ्या पक्षांमध्ये कार्यकर्ते खूप उत्सुक असतात. 9 वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. स्वाभाविक आहे की इच्छुकांची खूप मोठी गर्दी असते. तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही. त्यासोबतच स्थानिक स्तरावर काही वेगवेगळी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे तिथला निर्णय तिथेच घ्यावं लागते. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुका आम्ही स्वबळावरच लढत आहे. एखाद ठिकाणी कुठे तडजोड करायचा प्रसंग आल्यास आम्ही तसं तडजोड करू, असं माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.