
Eknath Shinde Shivsena Setback: छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नांदेडमध्ये पण भाजपने मोठी मुसंडी मारली. या दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपची एकहाती सत्ता येणे जवळपास निश्चित मानले जात आहे. निवडणुकीच्या निकालानंतर जी आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचे दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे अस्तित्वच पणा लागल्याचे दिसत आहे. तर ठाकरेंच्या सेनेचा मराठवाड्याचा गड चढतानाच श्वास फुलला. मनसेची अवस्था काय आहे, ते चित्र समोर आहे. पण भाजपविरोधात ज्या मित्र पक्षाने शड्डू ठोकले, त्याची पण मोठी दयनीय अवस्था झाल्याचे दिसते. त्यामुळे एकीकडे विरोधकांचा बंदोबस्त करतानाच भाजपने मित्र पक्षाला अस्मान दाखवल्याचे बोलले जात आहे.
नांदेडमध्ये एकहाती सत्ता
Mumbai Municipal Election Results 2026 : भाजपाच्या हातून मुंबई महापालिका जाणार? थेट घडामोडींना वेग, तब्बल...
BMC Election Results 2026 : मुंबईचा कारभारी काँग्रेसच ठरवार, महापाैर थेट...
मुंबईच्या प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोळी विजयी
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत 8 वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाला अवघ्या 6 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नांदेड महापालिकेची पहिलीच निवडणूक चर्चेत आली. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्याविरोधात विरोधक आणि मित्रही सक्रिय झाले होते. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी कठीण असल्याचे म्हटले जात होते. पण याठिकाणी भाजपने मोठी आघाडी घेतली.
नांदेड महानगरपालिकामध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्तेकडे भाजपची वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत 81 पैकी 43 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. आता बहुमताचा आणि सत्ता स्थापनेचा आकडा गाठणे भाजपला सोपं झालं आहे. या महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना मोठा करिष्मा करण्याची शक्यता वाटत होती. तर काँग्रेसही अनेकांचे टांगे फरार करण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण याठिकाणी भाजपने सर्वांचेच गणित विस्कटून टाकले.
शिंदेसेनेची कोरी पाटी
त्यात सर्वात मोठा फटका बसला तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला. राज्यातील इतर महापालिका प्रमाणे इथं शिंदेसेनेला थोडीही चांगली कामगिरी बजावता आली नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार शिंदे सेनेचे इथं अद्याप खातंही उघडलेलं नाही. शिंदे शिवसेना नेते आमदार हेमंत पाटील यांनी मोठा धक्का मानल्या जात आहे. विरोधकांसह भाजपने इथं मित्रपक्षाला औषधालाही ठेवलं नसल्याची चर्चा रंगली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनाला झटका
छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरेपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे भाजप आणि शिंदेसेनेने युती तुटल्याचे जाहीर केले. ऐनवेळी दोघांनही उमेदवार उभे केले. त्यामुळे ही दोन्ही पक्षांची खेळी मानल्या जात होती. पण या निकालाचे आकडे समोर आल्यावर वेगळेच चित्र दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 115 जागांपैकी भाजपच्या पारड्यात 56 जागा आल्या आहेत. अजून निकाल हाती येण्याची शक्यता आहे. महापौर पदासाठी 58 जागांचं गणित आहे. त्यामुळे इथंही भाजपला एकहाती सत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इथं कोणत्याही पक्षाचा टेकू घेण्याची कदाचित भाजपला गरज पडू शकत नाही.
एमआयएम शिंदे गटापेक्षा सरस
सध्याची जी आकडेवारी समोर येत आहे, त्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने मित्रपक्षाला ही अस्मान दाखवल्याचे दिसून येत आहे. महापालिकेत गेल्यावेळी प्रमाणेच एमआयएमने मोठी मुसंडी मारल्याचे दिसते. गेल्यावेळी एमआयएमचे 25 उमेदवार निवडून आले होते. तर सध्या त्यांचे 24 उमेदवार विजयाचा जल्लोष करताना दिसत आहेत. या ठिकाणी उद्धव सेनेला अवघ्या 6 जागांवर विजय मिळला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ 14 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे आता शिंदे सेना महापालिकेत विरोधी बाकांवर बसणार का? याची चर्चा रंगली आहे.