गुणरत्न सदावर्तेला पुन्हा सांगतो, आमच्या नादाला लागला तर…; मंगेश साबळे यांचा इशारा काय?

Mangesh Sable on Gunratna Sadavarte and Maratha Reservation : फासावर जाईल पण मराठा समाजासाठी लढेल; गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मंगेश साबळे यांचा निर्धार. तर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनाही पुन्हा इशारा. पाहा काय म्हणाले मंगेश साबळे...

गुणरत्न सदावर्तेला पुन्हा सांगतो, आमच्या नादाला लागला तर...; मंगेश साबळे यांचा इशारा काय?
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 1:26 PM

छत्रपती संभाजीनगर | 27 ऑक्टोबर 2023 : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. त्यांना अटकही झाली. यात मंगेश साबळे यांचाही समावेश होता. याच मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा इशारा दिला आहे. गुणरत्न सदावर्तेला मी सांगू इच्छितो की, परत आमच्या नादाला लागू नको. लागला तर तुझी मंगेश साबळेशी गाठ आहे, असा इशारा मंगेश साबळे यांनी दिला आहे. तर या गुणरत्न सदावर्तेमुळे माझे समाजबांधव आत्महत्या करत आहेत. पण मी माझ्या बांधवांना सांगू इच्छितो की, आत्महत्या करून मरू नका. तर लढून मरा, असंही मंगेश साबळे म्हणाले आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत केलेलं वक्तव्य ऐकून मला वाईट वाटलं. तरुणांनी आत्महत्या करून नये, त्यांनी लढावं यासाठी आम्ही कृत्य केलं. मनोज जरांगे मला हा मराठ्यांचा आहे का नाही हे तपासावे लागेल, असं गंभीर वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे मी दुखावलो गेलो. माझ्या जातीवर प्रश्न उपस्थित केला. हे माझ्यासाठी अत्यंत अपमानजनक आहे. ते मला पटलं नाही, असं म्हणत मंगेश साबळे यांनी संताप व्यक्त केला.

मी हिंसक नाही. पण हे गुणरत्न सदावर्ते हिंसक वक्तव्ये करतात. 33 वर्षांपासून मराठ्यांचं आंदोलन शांततेत सुरू आहे. 5 कोटी लोकांच्या भावना दुखवणाऱ्या व्यक्तीला आम्ही चाप लावला. मी आईची शपथ घेऊन सांगतो मी मातोश्रीवर नव्हतो. राजकीय भानगडीशी माझा संबंध नाही. याचं राजकारण करू नका. आमचे कॉल रेकॉर्ड तपासा आमचा कुणाशी काही संबंध नाही, असं म्हणत होणाऱ्या आरोपांनाही मंगेश साबळे यांनी उत्तर दिलं आहे.

मी फासावर गेलो तरी चालेल. पण मराठा समाजासाठी लढायचा मी निर्धार केला आहे. त्यासाठी तयार आहे. मी मनोज जरांगे यांच्या स्टेजवर होतो. त्यांच्या आंदोलनात सहभागी होतो. तरीही मला ते जातीचा आहे का हे विचारतात? याचं मला वाईट वाटलं. मला स्टंटबाज म्हणतात. पण मनोज जरांगे यांना सांगतो की, मला मीडिया नको मीडियात तुम्हीच बोला. मी मात्र समाजासाठी आता लढणार आहे, असं मंगेश साबळे म्हणाले.

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या तोडफोडीचं समर्थन करत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरही मंगेश साबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळे मला ठेच पोहोचली आहे. एक कोटीच्या सभेत मनोज जरंगे यांनी सरकारची झोप उडवली पाहिजे होती. पण त्यांनी ते केलेलं नाही, असंही मंगेश साबळे म्हणालेत.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.