
Sachin Khaire Win in Gulmandi Ward: मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटणे हे भाजपच्या पथ्यावर पडल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. आता अर्ध्याहून अधिक ठिकाणचे निकाल समोर आले आहेत. त्यात भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. तर त्यापाठोपाठ शिंदे सेनेने बाजी मारली आहे. या निकालात एआयएमआयएमने घेतलेली आघाडी अनेक पक्षांना धडकी भरवणारी आहे. गेल्या महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमने 25 जागांची घसघशीत कमाई केली होती. सध्या एमआयएमची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. त्यातच गुलमंडीत सुरुवातीच्या काही मतफेऱ्यात एमआयएमने आघाडी घेतल्याने शिवसैनिकांच्या काळजात धस्स झालं होतं.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत एमआयएम हा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे यावेळी एमआयएमने केवळ मुस्लिमबहुलच नाही तर हिंदू बहुल भागावर पण लक्ष केंद्रीत केले होते. शहरातील मुस्लिमबहुल मोडणाऱ्या 10 ते त्याहून अधिक प्रभागांवर एमआयएमचे लक्ष होतेच. पण त्यासोबत मिश्र संख्या असणाऱ्या आणि हिंदू बहुल मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न एमआयएमने केला.
Pune Nagarsevak Election Results 2026 : पुण्यात शिंदे गटाला थेट धक्का
Maharashtra Municipal Election Results 2026 : जालना महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता, थेट पंकजा मुंडे यांनी...
Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका
Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
हा विजय धन शक्तीचा नाहीत जन शक्तीचा आहे, शंकर जगताप यांचा हल्ला
पुणे महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय; अजितदादांशी युती नाहीच?
अन् सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलमंडी ही मुख्य बाजारपेठ आहे. गुलमंडी हा प्रभागात 15 अ मध्ये येतो. सकाळच्या काही फेऱ्यांमध्ये या प्रभागात एमआयएमच्या उमेदवाराने मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. उद्धव ठाकरे गटाने या प्रभागातून चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांना उमेदवारी दिली होती. गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तर बेगमपुरा पोटनिवडणुकीत सचिन खैरे यांचे पुनर्वसन करण्यात खैरेंना यश आले होते. यंदा सचिन खैरे यांनी चांगलीच कंबर कसली होती. पण एमआयएमने सुरुवातीला आघाडी घेतल्याने अनेकांचे चेहरे पडले होते. पण पुढच्या काही फेऱ्यात खैरे यांनी मोठी आघाडी घेतली आणि सचिन खैरे या प्रभागातून विजयी झाले. यामुळे शिवसैनिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत खैरे हे रशीद मामूंच्या प्रवेशामुळे अस्वस्थ मानल्या जात होते. अंबादास दानवे आणि त्यांच्यातील शीतयुद्धाची पुन्हा एकदा चर्चा रंगली होती. यावेळी सुद्धा सचिन खैरे यांना विजय हुलकावणी देतो की काय याची चर्चा होत होती. पण यंदा खैरे यांनी सुक्ष्म नियोजन करुन विजय खेचून आणल्याचे म्हटले जाते.
गुलमंडीवर पुन्हा ठाकरेंचा शिवसैनिक नगरसेवक
चंद्रकांत खैरे -शिवसेना- 1988
प्रदीप जैस्वाल -शिवसेना- 1995
किशनचंद तनवाणी-शिवसेना-2000
किशनचंद तनवाणी-शिवसेना-2005
प्रीती तोतला- शिवसेना – 2010
राजू तनवाणी – अपक्ष-भाजप समर्थित- 2015
सचिन खैरे-उद्धव ठाकरे शिवसेना-2026