मराठा समाजाच्या बैठकीत मारहाण झालेल्या विकीने मनोज जरांगे यांच्याकडे काय मागणी केली?

मराठा समाजाच्या बैठकीत काल राडा झाला. या राड्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहेत. त्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

मराठा समाजाच्या बैठकीत मारहाण झालेल्या विकीने मनोज जरांगे यांच्याकडे काय मागणी केली?
Clash at Maratha Community Meeting
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 1:12 PM

मराठा समाजाची काल छत्रपती संभाजी नगर शहरात बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठा मंदिरमध्ये लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक सुरू होती. त्याचवेळी या बैठकीला वादाच गालबोट लागलं. बैठकीला उपस्थित असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आपसात भिडले. अक्षरक्ष: लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली. मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार उमेदवार ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. 60 ते 70 समाज बांधव बैठकीला उपस्थित होते. बैठक शांततेच्या मार्गाने सुरू होती, मात्र अचानक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप केला.

काही जणांची नाव पुकारण्यात आली, त्यावरुन वादावादी झाली, असं बैठकीत सहभागी असलेल्यांनी सांगितलं. आरोपानंतर विकी पाटील या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या तरुणावर छत्रपती संभाजी नगर शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना या तरुणाने टीव्ही नाईन मराठी ला प्रतिक्रिया दिली.

तरुणाला काय अपेक्षा?

“मी सर्वसामान्य कुटुंबातला असून प्रस्थापित लोक मला मारहाण करून दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मनोज जरंगे यांनी या प्रकरणात लक्ष घालून मला न्याय द्यावा” अशी अपेक्षा या तरुणाने व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

“भांड्याला भांडं लागतच असतं. त्यावर लगेच भूमिका घ्यायची गरज नाही. पण आम्ही दोन्ही बांधवांना बोलवून घेऊ. त्यांचा काय विषय आहे ते समजून घेऊ. दोघांना बोलवून घेऊ. मार्ग निघणार. समाज एकत्र आहे. समाज तुम्हाला एकत्रित दिसणार आणि एकत्र राहणार. आपले मत जर ग्राह्य धरले जात नसेल, आपली किंमत केली जात नसेल, तर आपल्याला एका टोकाच्या भूमीवर यावं लागतं. तुम्ही नाही जिंकत ना आम्ही, तर आम्ही तुमचे पाडू शकतो ही शक्ती मराठे यावेळेस दाखवणार आहेत. मग त्यांना कळेल की, आपण हा नसता जाळ अंगावर घेतला आहे” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर दिली आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.